Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उपाशीपोटी तिरुपती मंदिराच्या पायऱ्या चढायला लावल्या"; गौतम सिंघानियांच्या पत्नीचा नवा आरोप

उपाशीपोटी तिरुपती मंदिराच्या पायऱ्या चढायला लावल्या"; गौतम सिंघानियांच्या पत्नीचा नवा आरोप

रेमंड ग्रुपचे संचालक गौतम सिंघानिया सध्या त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आले आहे. गौतम सिंघानिया यांनी नवाज मोदी आणि आपण विभक्त होत असल्याची घोषणा गौतम सिंघानिया यांनी ट्विटरच्या अधिकृत अकाऊंटवरुन केली होती. त्याच दिवशी नवाज मोदी यांना रेमंड हाऊसच्या दिवाळी पार्टीला येऊ न दिल्याचा आणि त्यांनी दाराबाहेर ठिय्या मांडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. गौतम सिंघानियांनी मला आणि माझ्या मुलींना मारहाण केली असाही आरोप नवाज मोदींनी केला आहे. आता त्यात आणखी एक नवीन आरोप नवाज मोदी यांनी केला आहे.

नवाज मोदींची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. ज्यामध्ये नवाज मोदींनी म्हटलं आहे की,”गौतम सिंघानिया यांनी त्यांना उपाशीपोटी तिरुपती मंदिराच्या पायऱ्या चढायला लावल्या. त्यांचं असं म्हणणं आहे गौतम सिंघानियांनी मी लग्नाला होकार दिल्यानंतर मला ते तिरुपतीच्या दर्शनाला घेऊन गेले होते. त्यावेळी मला पाणीही दिलं नाही, अन्न तर सोडाच पण उपाशीपोटी सगळ्या पायऱ्या चढायला लावल्या. एक-दोनदा तर मला चक्कर आली होती. मात्र गौतम सिंघानिया यांना दया आली नाही.” असे त्यांनी यात म्हटले आहे.


पुढे नवाज मोदी म्हणाल्या, मला गौतम सिंघानियांनी सांगितलं की तुला या पायऱ्या उपाशीपोटी चढून जायचं आहे. मला तेव्हा काहीही कल्पना नव्हती की नेमक्या किती पायऱ्या आहेत. मला चक्कर येता येता राहिली मात्र गौतम सिंघानियांनी माझ्याकडे काहीही लक्ष दिलं नाही. तुला पायऱ्या चढाव्याच लागतील अशी सक्ती ते करत राहिले आणि मला उपाशी पोटी तिरुपतीच्या मंदिरात नेलं असा आरोप आता नवाज मोदींनी केला आहे. गौतम सिंघानिया हे तिरुपती बालाजीचे भक्त आहेत. त्यामुळे त्यांनी असे केल्याचेही नवाज मोदी यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे.


गौतम सिंघानिया हे त्यांच्या उंची आणि राजेशाही जीवनपद्धतीसाठी ओळखले जातात. त्यांचा आणि नवाज मोदी यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. गौतम सिंघानिया यांच्याकडे नवाज मोदींनी त्यांच्या संपत्तीच्या ७५ टक्के रक्कम मागितली आहे. एका मुलाखतीत नवाज मोदी यांनी हादेखील आरोप केला होता की गौतम सिंघानिया यांनी आपल्याला आणि आपल्या मुलींना मारहाण केली. ९ सप्टेंबरच्या दिवशी पहाटे आम्हाला मारहाण झाली आणि त्यानंतर गौतम सिंघानिया तिथून निघून गेले असं त्या म्हणाल्या होत्या. या सगळ्या आरोपांवर गौतम सिंघानिया यांनी बोलण्यास नकार दिला आहे. माझ्या प्रायव्हसीचा आदर ठेवा, मला घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर आणायच्या नाहीत असे त्यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला सांगितले होते. आता नवाज मोदी आणि गौतम सिंघानिया यांच्यातल्या किती आरोपांची मालिका समोर येते आहे ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.