Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कलेक्टरच्या भरधाव गाडीने चौघांना उडवले, ३ जणांचा मृत्यू

कलेक्टरच्या भरधाव गाडीने चौघांना उडवले, ३ जणांचा मृत्यू

बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात मधेपुराचे जिल्हाधिकारी विजय प्रकाश मीना यांच्या अधिकृत वाहनाला झालेल्या अपघातात एक महिला आणि तिच्या सात वर्षांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली. या अपघातात ७ वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी सांगितले की, मधुबनी जिल्ह्यातील फुलपारस चौकाजवळ राष्ट्रीय महामार्ग 47 वर सकाळी 8 च्या सुमारास मधेपुरा जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन दरभंगाहून 100 किमी अंतरावर मधेपुरा येथे परतत असताना हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी सांगितले की, कारने गुडिया देवी ( 27) आणि तिची मुलगी (7) यांच्यासहीत महामार्गावर काम करणाऱ्या दोन मजुरांना धडक दिली. जखमी कामगारांना दरभंगा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेण्यात आले. त्यापैकी अशोक सिंग (राजस्थान) या कामगाराचा मृत्यू झाला. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरु आहे.


अपघातानंतर काही वेळातच परिसरातील संतप्त नागरिक घटनास्थळी जमा झाले आणि महामार्ग रोखून धरला. अपघातात सामील असलेल्या वाहनाची मागील विंडशील्ड देखील कोणीतरी तोडली. मधेपुरा जिल्ह्याचे जनसंपर्क अधिकारी कुंदन कुमार सिंग यांनी मधुबनी येथे घडलेल्या वृत्ताचे खंडन करत म्हटले आहे की, अपघात झाला तेव्हा जिल्हाधिकारी गाडीत नव्हते.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.