Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

घशाच्या कर्करोगासाठी ओरल सेक्स हे धूम्रपानापेक्षाही धोकादायक; डॉक्टरांचा दावा

घशाच्या कर्करोगासाठी ओरल सेक्स हे धूम्रपानापेक्षाही धोकादायक; डॉक्टरांचा दावा


आधी एका चिंताजनक अभ्यासात आढळून आले होते की, अनेक जोडीदारांसोबत मुखमैथुन म्हणजेच ओरल सेक्स करणाऱ्या पुरुषांना एचपीव्हीशी संबंधित डोके आणि मानेच्या कर्करोगाचा धोका असतो. आता एका तरुण डॉक्टरचे म्हणणे आहे की, घशाचा कर्करोग होण्यासाठी धुम्रपानापेक्षा ओरल सेक्स हा घटक जास्त कारणीभूत असतो.

अमेरिकन कॅन्सर सोसायटी (ACS) ने तंबाखूचा वापर हा ऑरोफॅरिंजियल कॅन्सर  म्हणून ओळखल्या जाणार्‍या आजारासाठी नंबर एक जोखीम घटक असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता डॉ. डारिया सदोव्स्काया  या डॉक्टरने टिकटोक व्हिडिओमध्ये सांगितले की, ऑरोफॅरिंजियल कॅन्सरसाठी धुम्रपानापेक्षा ओरल सेक्स जास्त कारणीभूत आहे.

अमेरिकन कॅन्सर सोसायटीनेही घशाच्या कर्करोगाचे एक संभाव्य कारण म्हणून ओरल सेक्स उद्धृत केले आहे. कारण सामान्यतः एचपीव्ही (HPV) म्हणून ओळखले जाणारे ह्युमन पॅपिलोमाव्हायरस हे ओरल सेक्सद्वारे प्रसारित होऊ शकतात. एचपीव्ही हा 200 पेक्षा जास्त संबंधित विषाणूंचा समूह आहे, ज्यापैकी काही योनिमार्गातून, गुदद्वारातून किंवा मुखमैथुनाद्वारे पसरतात. एचपीव्ही हा सर्वात सामान्य लैंगिक संक्रमित संसर्ग आहे व याची यूएसमध्ये दरवर्षी अंदाजे 13 दशलक्ष नवीन प्रकरणे आढळतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.