Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कुरियर ऑफिसमध्ये चोरी करणाऱ्यास अटक१४.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

कुरियर ऑफिसमध्ये चोरी करणाऱ्यास अटक१४.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

सांगली :  सांगली शहरातील पत्रकारनगर परिसरात असलेल्या कुरियर ऑफिसमध्ये चोरी करणाऱ्या एकास अटक करण्यात आली. त्याच्याकडून १४.१३ लाखांची रोकड एक मोपेड असा १४.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.

गणेश नागेश मदने (वय ३०, रा. लक्ष्मीनारायण कॉलनी, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शहरातील पत्रकारनगर परिसरात इन्स्टाकार्ट कुरियर कंपनीचे ऑफिस आहे. या ऑफिसमधील रोकड चोरीला गेल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. त्यानंतर विद्यानंद कामत यांनी याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या चोरीचा छडा लावण्यासाठी निरीक्षक श्री. शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक विशेष पथक तयार केले होते. या त्यानुसार पथक चोरट्यांचा शोध घेत होते.
 
पथकातील विक्रम खोत यांना ही चोरी गणेश मदने याने केल्याची माहिती मिळाली. तसेच तो शंभर फुटी रस्ता ते उषःकाल हॉस्पिटल रस्त्यावरून जाणार असल्याची माहितीही खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर पथकाने त्या परिसरात सापळा रचला. काही वेळानंतर एका मोपेडवरून जाताना तो दिसला. त्यानंतर पथकाने त्याला अडवून ताब्यात घेतले. त्याच्याकडे कुरियर आफिसमधील चोरीबाबत कसून चौकशी केल्यानंतर त्याने मित्राची मोपेड घेऊन ऑफिसच्या खिडकीचे गज कापून त्यातील रोकड चोरल्याची कबुली दिली. तसेच ती रोकड घरात ठेवल्याचेही सांगितले. पथकाने त्याच्या घरी छापा टाकून रोकड जप्त केली. तसेच त्याला अटक केलीत्याला सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  

एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, बिरोबा नरळे, सागर लवटे, संदीप नलवडे, अमर नरळे, विक्रम खोत, अनिल कोळेकर, सागर टिंगरे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.