Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बायकोची पतीला जबर मारहाण, पतीचा जागीच मृत्यू

बायकोची पतीला जबर मारहाण, पतीचा जागीच मृत्यू


झोपमोड केल्याच्या रागातून भाडेकरूने घरमालकाची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार पुण्यात घडला. ही घटना ताजी असतानाच आणखी एक हत्येची घटना समोर आली आहे. शहरातील वानवडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये पत्नीने पतीची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

घरगुती वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले असून, पोलिसांनी आरोपी पत्नीला पतीची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. घरगुती वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले असून, पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतलं आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील वानवडी परिसरात पत्नीने पतीची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. शुक्रवारी (२४, नोव्हेंबर) दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रेणुका खन्ना रा.वानवडी (वय.३६)व निखिल पुष्पराज खन्ना, (वय ३६) या पती- पत्नीमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला.

याच वादाच्या रागातून पत्नी रेणुका खन्नाने पती निखिलच्या तोंडावर ठोसा लगावला. या हल्ल्यात जबर मार लागल्याने निखिलचा मृत्यू झाला. याबाबत हल्लेखोर पत्नीने सासरे डॉ पुष्पराज खन्ना यांना फोन करून माहिती दिली. दरम्यान, मृत व्यक्ती ही बांधकाम व्यवसाय असून, घरी आई-वडील, बायको ४ जण राहत राहत होते. मयत व आरोपी यांचे ६ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. आरोपीला वानवडी पोलिसांनी अटक करून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.