Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमदार सुधीर दादा गाडगीळ यांचा मराठा आंदोलनास पाठींबा

आमदार सुधीर दादा गाडगीळ यांचा मराठा आंदोलनास पाठींबा


सांगली १ नोव्हेंबर २३ :- श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण उपोषणाच्या समर्थनार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा मोर्च्याच्या साखळी उपोषणास हजर राहून आमदार सुधीर गाडगीळ यांनी आपला पाठींबा जाहीर केला. मराठा समाजाने नेहमीच सर्व जाती-धर्मांमध्ये सलोखा निर्माण करत मोठया भावाची भूमिका निभावलेली आहे. मराठा समाजातील अनेक सर्वसामान्य कुटुंबांची परिस्थिती आज खूपच बिकट आहे. ती निश्चितच सर्वांनी समजावून घेण्याची गरज आहे. आजवर लाखो मराठा कुटुंबे भूमिहीन झाली आहेत. कधी सततचा दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे त्यांच्या कुटुंबाची पार वाताहत झाली.

कर्जबाजारीपणामुळे त्यांचा आत्मसन्मान हरवला. कुटुंबातील लोकांच्या जगण्याचे, मुलामुलींच्या शिक्षणाचे आणि लग्नाचे प्रश्न उग्र रूप धारण करत आहेत. फक्त जात "मराठा" म्हणून त्यांची शिक्षणाची व नोकरीची संधी डावलली जाणे हे निश्चितच त्यांच्यासाठी अन्यायकारक आहे. आरक्षण मिळाल्यास महाराष्ट्रातील मराठा समाजाला दिलासा मिळेल. मी स्वत आमदारांच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित करून लवकरात लवकर आरक्षण लागू करावे, यासाठी आग्रही राहणार आहे तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विशेष अधिवेशन घेण्यासाठी विनंती केली आहे.  असे आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले,

यावेळी मराठा मोर्चास्थळी उपस्थित सतीश साखळकर, संजय पाटील संभाजी पोळ, लोकसभा संयोजक दिपकबाबा शिंदे,  ज्येष्ठ नेते प्रकाश बिरजे, श्रीकांत शिंदे, प्रवक्ते मुन्ना कुरणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे  पाटील, माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, कल्पना कोळेकर, उर्मिला बेलवलकर, अप्सरा वायदंडे, धीरज सूर्यवंशी, विश्वजित पाटील, युवराज बावडेकर, अशरफ वांकर, उदय मुळे, अविनाश मोहिते, विशाल पवार, दरीबा बंडगर, रोहित जगदाळे, अतुल माने, बंडू सरगर अनिकेत खिलारे, सुजित राऊत, किरण भोसले, पृथ्वीराज पाटील, सिद्धार्थ गाडगीळ, अमित देसाई, बाळासाहेब बेलवलकर, चेतन माडगूळकर, प्रदेश सदस्या स्मिता पवार, माधुरी वसगडेकर, शैलेश पवार, मकरंद म्हामुलकर  आदी पदाधिकारी उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.