Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एड्सपासून कसे वाचाल? लक्षणे काय? कशी घ्याल काळजी? वाचा सविस्तर

एड्सपासून कसे वाचाल? लक्षणे काय? कशी घ्याल काळजी? वाचा सविस्तर


एड्स हा एक गंभीर आजार आहे. एड्स आजारावर आजही औषधोपचार किंवा कोणतीही लस उपलब्ध नाही. त्यामुळे या आजाराबाबत जनजागृती होणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठीच जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. दरवर्षी १ डिसेंबरला हा दिवस साजरा केला जातो. एड्स हा आजार जीवघेणा ठरु शकतो. यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. यामुळे सर्दी खोकला या किरकोळ आजारांशी लढणेदेखील कठीण होते. या आजारावर कोणताही इलाज नाही. त्यामुळे हा आजार होऊ नये याची जास्त काळजी घ्यायची असते.

एड्स म्हणजे काय?

एड्सचे म्हणजे एक्क्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. हा एचआव्ही संसर्गाचा शेवटचा टप्पा असतो. हा विषाणू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरु शकतो. त्यामुळे आपण एड्स आजाराला बळी पडू शकतो. दुसऱ्याला वापरण्यात आलेल्या इंजेक्शनचा वापर, बाळाला जन्म, जन्माच्या वेळी स्तनपान करताना हा आजार पसरु शकतो. त्यामुळे कधीही डॉक्टरकडे गेल्यावर इंजेक्शन नवीन घेतात की नाही याकडे लक्ष द्यायला हवे. खोकताना शिंकताना तोंडावर हात ठेवायला हवे. जर आपल्या आसपास कोणी शिंकत असेल तर त्यापासून ठरावीक अंतर ठेवायला हव.

एचआयव्ही संसर्गाचे तीन टप्पे असतात. एक्यूट एचआईवी इन्फेक्शन हा पहिला टप्पा असतो. ज्यात फ्लू झाल्यासारखी लक्षणे दिसतात. त्यातील दुसरा टप्पा म्हणजे क्लिनिकल लेटन्सी. या अवस्थेत कोणतीही लक्षणे दिसत नाही. त्यावेळी काळजी घ्यायला हवी. त्यानंतर तिसरा आणि शेवटचा टप्पा म्हणजे एड्स.

लक्षणे

अशक्तपणा

ताप येणे

घाम फुटणे

थंडी जाणवणे

पुरळ येणे

वेदना होणे

थकवा जाणवणे

उल्टी

वजन कमी होणे

काळजी कशी घ्याल

कंडोमचा वापर

कोणत्याही प्रकारचे शारीरिक संबंध ठेवताना कंडोम वापरा. शारीरिक संबंध ठेवल्याने एचआयव्ही विषाणूची लागण होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे नेहमी सुरक्षित पद्धतीने शारीरिक संबंध ठेवा आणि प्रत्येक वेळी नवीन कंडोम वापरा. तसेच जर तुम्ही शारिरीक संबंध ठेवत असाल तर नियमितपणे STI चाचणी करा . त्यामुळे जर तुमच्या जोडीदाराला एचआव्ही संसर्ग असेल तर वेळीच काळजी घेता येईल.

नेहमी नवीन इंजेक्शन वापरावे

एकदा वापरलेली इंजेक्शन परत वापरल्यानेदेखील एड्स आजार पसरु शकतो. त्यासाठी नेहमी इंजेक्शन घेताना काळजी घ्यावी. इंजेक्शन घेताना डॉक्टर वापरलेले इंजेक्शन तर वापरत नाही ना याकजे लक्ष द्या. तसेच टॅटू तयार करताना कोणती सुई वापरतात हे बघा. टॅटू काढताना विशेष लक्ष द्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.