Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दारू न मिळाल्याने दारूड्याने पेटवले दुकान; दीड लाखांचे नुकसान

दारू न मिळाल्याने दारूड्याने पेटवले दुकान; दीड लाखांचे नुकसान


आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील एका दारूड्याने दारू न मिळाल्याने वाईन शॉपलाचं आग लावली. तसेच रागाच्याभरात दुकानातील कर्मचाऱ्यावर पेट्रोल शिंपडून त्याला देखील पेटवण्याचा प्रयत्न केला, मात्र सुदैवाने तो बचावला.

पोथिनमल्लय्या पालम पोलिस स्थानकातील निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, मदुरवाडा भागातील वाईनशॉपमध्ये शनिवारी रात्री मधू नावाचा व्यक्ती आला, दुकान बंद करण्याची वेळ असल्याने दुकानातील कर्मचाऱ्यांनी त्याला दारू देण्यास नकार दिला. यावरून मधू आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाली. भांडणानंतर मधू तेथून निघून गेला. मात्र रविवारी संध्याकाळी तो पुन्हा एकदा दुकानावर गेला. यावेळी त्याने स्वत: सोबत पेट्रोल आणले होते. दुकानावर आणि आत असलेल्या कर्मचाऱ्यांवर पेट्रोल टाकून त्याने आग लावली.

आग लागलेली पाहताच आत असलेल्या कर्मचारी दुकानातून बाहेर पडले. मात्र दुकानातील संगणक, प्रिंटरसहित जवळपास दिड लाखाचा माल जळून खाक झाला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, आरोपीवर आयपीसीच्या कलम 307 आणि 436 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.