Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जनरल मोटर्सच्या कामगारांचा परिवार आक्रमक, काळ्या साड्या नेसून मंत्र्यास दिल्या भाऊबीजेच्या शुभेच्छा

जनरल मोटर्सच्या कामगारांचा परिवार आक्रमक, काळ्या साड्या नेसून मंत्र्यास दिल्या भाऊबीजेच्या शुभेच्छा


मावळ येथील तळेगाव दाभाडे एमआयडीसी मधील बंद पडलेल्या जनरल मोटर्सचे कामगार आणि त्यांचे कुटुंबियांनी ऐन दिवाळी सणात अनाेख्या पद्धतीचे आंदाेलन छेडेले. जनरल मोटर्स कंपनी व राज्य सरकार यांच्याकडून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आज जनरल मोटर्सच्या कामगारांच्या परिवारातील महिलांनी काळ्या साड्या नेसून प्रतिनिधिक स्वरूपात कामगार मंत्री सुरेश खाडे  यांच्या प्रतिमेला भाऊबीज ओवाळून निषेध नाेंदविला.

मावळातील  तळेगांव जनरल मोटर्सच्या कामगारांचे आंदोलन हे गेली पंचेचाळीस दिवसांपासून सुरू आहे. तब्बल एक हजार कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. दीड महिन्यापासून कामगारांचा परिवार उपोषण करत आहे.

या आंदाेलकांना दसरा आणि दिवाळी हे दाेन्ही सण रस्त्यावर बसूनच काढावे लागले. दरम्यान आज कामगारांच्या परिवारातील महिलांनी काळ्या साड्या नेसून प्रतिनिधिक स्वरूपात कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या प्रतिमेला भाऊबीज ओवाळून एक हजार कामगारांच्या नोकऱ्या वाचाव्यात हीच ओवाळणी आम्हाला द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या कामगारांच्या परिवाराची दिवाळी शिंदे सरकारने काळी केली ती निषेधार्थ उपोषणस्थळी कामगारांनी मुंडन करून काळा कंदील लावून सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा जाहीर निषेध करण्यात आला होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.