Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

श्रीमती रितू सांगलीच्या अपर पोलिस अधीक्षक

श्रीमती रितू सांगलीच्या अपर पोलिस अधीक्षक

मुंबई : राज्यातील 10 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या सवर्च अधिकाऱ्यांना वरीष्ठ समय श्रेणीत पदोन्नती देऊन त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव स्वप्नील बोरसे यांच्या स्वाक्षरीने सोमवारी रात्री बदल्यांचे हे आदेश काढण्यात आले आहेत. आयपीएस अधिकारी श्रीमती रितू यांची सांगलीच्या अपर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्या सातारा जिल्ह्यात उपअधीक्षक पदावर कायर्रत आहेत. त्या २०१८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. 

बदली झालेल्यांमध्ये २०१७ च्या बॅचचे एम. रमेश यांची गडचिरोलीचे अपर पोलिस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. २०१९ च्या बॅचचे नित्यानंद झा यांची गोंदियाचे अपर पोलिस अधीक्षक, श्रेणीक लोढा यांची राज्यपाल यांचे परिसहायक म्हणून बदली करण्यात आली आहे. गौहर हसन यांची धाराशिवचे अपर पोलिस अधीक्षक तर आयुष नोपाणी यांची जालनाचे अपर पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 
 

आदित्य मिरखेलकर यांची नाशीक ग्रामीणचे अपर पोलिस अधीक्षक म्हणून तर पंकज कुमावत यांची अंबेजोगाईचे अपर पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदीप रावले यांची सिंधुदुगर्चे अपर पोलिस अधीक्षक म्हणून तर निकेतन कदम यांची नागपूर शहरचे पोलिस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.