Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गुगवाड धम्मभूमी येथे उद्या धम्म परिषद; सी आर सांगलीकर

गुगवाड धम्मभूमी येथे उद्या धम्म परिषद; सी आर सांगलीकर 


जत, ता. १० : गुगवाड येथील अथर्व चंद्रकांत सांगलीकर ट्रस्टतर्फे धम्मभूमीच्या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून रविवारी (ता. १२) धम्मपरिषद आयोजित केली आहे. भिक्खू संघ, महास्थवीर, स्थवीर, श्रमणेर, धम्माचार्य, बौद्धाचार्य व विविध क्षेत्रातील देशभरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती उद्योजक अॅड. सी. आर. सांगलीकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.

सांगलीकर म्हणाले, "रविवारी सकाळी ८.३० वाजता धम्म ध्वजारोहण, बुद्धमूर्ती पूजा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन, भिक्खू संघाच्या हस्ते धम्मपरिषदेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. 'भावनिक समतोल जोपासणे वभावनिक कल्याणामध्ये बौद्ध धम्माच्या विचारांचे अनुकरण करणे' या विषयावर मान्यवारांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. दरम्यान, गुगवाड येथे उभारण्यात आलेल्या धम्मभूमीमुळे देशभरात जत तालुक्याची ओळख निर्माण झाली आहे. 

बाहेरील देशातील लोकांनी याठिकाणी भेटी दिल्या आहेत. यापुढे विपश्यना केंद्र, वाचनालयासह विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. जत तालुक्याच्या वैभवात भर पडावी, अशी धम्मभूमी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना वाटावी. शिवाय, पश्चिम महाराष्ट्रात बौद्ध धम्म वाढविण्यासाठी प्रयत्न करू, असेही अॅड. सांगलीकर यांनी सांगितले. यावेळी रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कांबळे व जत तालुकाध्यक्ष संजय कांबळे-पाटील आदी उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.