Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उद्यापासून एसटीची वाहतूक ठप्प होणार? सदावर्तेंनी पुन्हा एकदा दिली संपाची हाक

उद्यापासून एसटीची वाहतूक ठप्प होणार? सदावर्तेंनी पुन्हा एकदा दिली संपाची हाक 


मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर सोमवार ६ नोव्हेंबरपासून राज्यातील एसटी वाहतूक पुन्हा ठप्प होण्याची शक्यता आहे. विलीनीकरण, सातवा वेतन आयोग आणि इतर काही मागण्यांसाठी गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिली आहे. याबाबतची नोटीस एसटी महामंडळाला दिली आहे.


महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची नोटीस मिळाली असल्याचे सांगितले. सातवा वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत नवीन समिती स्थापन करावी, त्या समितीसमोर कर्मचाऱ्यांचे मत मांडण्याची सुविधा देण्यात यावी, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या दोन प्रमुख मागण्या गुणरत्न सदावर्ते यांनी केल्या आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.