Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

घरफोड्या करणाऱ्या तिघांना अटक, तब्बल १६ गुन्हे उघड२६ लाखांचे दागिने, वाहन जप्त, तासगाव पोलिसांची कारवाई

घरफोड्या करणाऱ्या तिघांना अटक, तब्बल १६ गुन्हे उघड२६ लाखांचे दागिने, वाहन जप्त, तासगाव पोलिसांची कारवाई


सांगली :  तासगाव शहरासह परिसरात घरे फोडून दागिने, रोकड लंपास करणाऱ्या तिघांच्या टोळीला अटक करण्यात आली. या टोळीतील दोघेजण पसार झाले आहेत. चोरट्यांकडून चोरीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेले वाहन असा २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती तासगावचे पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली.  

जितेंद्र दगडू काळे (वय ४८), संजय जंगाप्पा काळे (वय ४०), निहाल जितेंद्र काळे (वय १९, तिघेही रा. करगणी, ता. आटपाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर रोहित पवार (रा. करगणी), सनी शिंदे (रा. फलटण) हे दोघे पसार झाले आहेत. तासगाव शहरासह परिसरात घरफोडी, चोरीचे गुन्हे वाढल्याने तासगावचे पोलिस निरीक्षक श्री. वाघ यांनी यातील चोरट्यांना तातडीने अटक करण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या.

पथकाने या गुन्ह्यांचा तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण तपास केला. त्यावेळी जितेंद्र काळे आणि त्याच्या साथीदारांनी या चोऱ्या केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पथकाने जितेंद्र काळे, संजय काळे यांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने १६ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेला टेम्पो (एमएच १० सीआर १९७०) असा २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच निहाल काळे अटक केली. अन्य दोघे मात्र पसार झाले. 

तासगावचे पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नामदेव तराडे, अमोल चव्हाण, अमर सूर्यवंशी, समीर आवळे, विवेक यादव, सचिन जौंजाळ, योगेश जाधव, पवन जाधव, कॅप्टन गुंडवाडे, अजय जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.