Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कुरियर डिलीव्हरी बॅयची लुटमार करणाऱ्या दोघांना अटकचार गुन्हे उघड, उमदी पोलिसांची कारवाई

कुरियर डिलीव्हरी बॅयची लुटमार करणाऱ्या दोघांना अटकचार गुन्हे उघड, उमदी पोलिसांची कारवाई

सांगली : जत तालुक्यातील कागनरी येथे कुरियर डिलीव्हरी बॅयला अडवून त्याला अडवून त्याच्याकडील ऐवज लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीची रोकड, साहित्य असा ७४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याची माहिती उमदीचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली. 

विकास भिवा शिंदे (वय २५), बाळासो रामा मोटे (वय ३२, दोघेही रा. मोटेवाडी, ता. जत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास बाळासाहेब टिळे कुरियर डिलीव्हरी करण्यासाठी कागनरी येथे आले होते. त्यावेळी विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना धमकावत, मारहाण करत त्यांच्याकडील बॅग, रोकड जबरदस्तीने काढून घेऊन गेले होते. याबाबत टिळे यांनी उमदी पोलिस ठाण्यात फियार्द दिली होती. त्यानंतर सहायक निरीक्षक शिंदे यांनी या गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. 

गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक चोरट्यांचा शोध घेत होते. त्यावेळी सहायक निरीक्षक शिंदे यांना शिंदे आणि मोटे यांच्याकडे कुरियर डिलीव्हरीची बॅग पाहिल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी टिळे यांना लुटल्याची कबुली दिली. शिवाय दुचाकी चोरल्याचीही कबुली दिली. त्यानंतर त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी तसेच चोरलेल्या दोन दुचाकी असा ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  उमदीचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मागर्दशर्नाखाली उपनिरीक्षक शिरीष शिंदे, प्रशांत कोळी, सोमनाथ पोटभरे, सोपान भंडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.