Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कॅन्सरच्या चेकअपसाठी आलेल्या रूग्णाच्या पोटात दिसलं असं काही, बघून डॉक्टरही हैराण

कॅन्सरच्या चेकअपसाठी आलेल्या रूग्णाच्या पोटात दिसलं असं काही, बघून डॉक्टरही हैराण 


मेडिकल विश्वात आजकाल अशा काही केसेस बघायला मिळतात ज्यामुळे डॉक्टरही हैराण होतात. अमेरिकन जर्नल ऑफ गॅस्ट्रोएंटरोलॉजीमध्ये नुकताच अमेरिकेच्या एका 63 वयाच्या व्यक्तीचा एक रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला. यात एका व्यक्तीच्या शरीराच्या आत जे दिसलं ते पाहून डॉक्टरही चक्रावून गेले.

ही व्यक्ती या वर्षाच्या सुरूवातीला कोलन कॅन्सरच्या रेग्युलर चेकअपसाठी आली होती. मिसौरी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्याची कोलोनोस्कोपी केली. या टेस्टमध्ये आतड्यांमध्ये एक कॅमेरा टाकला जातो. इथे शरीरात कॅमेरा टाकल्यानंतर डॉक्टरांना जे दिसलं ते पाहून त्यांना धक्का बसला. त्यांना आत एक माशी दिसली जी कशीतरी गॅस्ट्रिक अॅसिडपासून वाचली होती आणि व्यक्तीच्या शरीरात जिवंत आरामात बसली होती. डॉक्टरांनी रिपोर्टमध्ये लिहिलं की, 'ही एक फार रेअर कोलोनोस्कोपी फायडिंग आहे. ही माशी व्यक्तीच्या शरीरात कशी पोहोचली हे अजून समजू शकलेलं नाही'

हेही एक सत्य आहे की, फळं आणि भाज्यांवर असलेल्या माश्यांचे लार्वा कधी कधी आपल्या पोटातील अॅसिडपासून वाचतात आणि मग आपल्या आतड्यांमध्ये वाढतात. डॉक्टरांनुसार, रूग्णाने कोलोनोस्कोपीच्या एक दिवसआधी केवळ लिक्विड फूड सेवन केलं होतं. आपल्या 24 तासांच्या फास्टआधी त्यानी पिझ्झा आणि सलाद खाल्ला होता. पण त्यांना आपल्या खाण्यात माशी दिसली नव्हती. डॉक्टरांनी माशीला हलवण्याचा प्रयत्न केला, पण ती जागेवरून हलली नाही. सध्या ती व्यक्तीच्या पोटात आहे. माशी काढण्यासाठी डॉक्टर वेगळा उपाय शोधत आहेत.

ही काही अशी पहिली घटना नाही ज्यात लोकांच्या शरीरात अजब गोष्टी दिसून आल्या. काही दिवसांआधी पंजाबच्या मोगा 40 वर्षीय व्यक्तीच्या पोटाचं ऑपरेशन करून अनेक वस्तू काढण्यात आल्या. तीन तास चाललेल्या या ऑपरेशनमध्ये व्यक्तीच्या पोटातून एअरफोन, नट-बोल्ट, स्क्रू, राखी, माळ, सेफ्टी पिन, लॉकेटसहीत 100 पेक्षा जास्त वस्तू निघाल्या. व्यक्तीच्या परिवाराला या वस्तू त्याच्या पोटात कशा गेल्या हे माहीत नव्हतं. सोबतच कुटुंबियांनी सांगितलं होतं की, त्यांचा मुलगा मानसिक समस्येने ग्रस्त आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.