Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केंद्रातील सरकार गरिबांचे नाही, धनदांडग्यांचे, राहुल गांधी यांची टीका

केंद्रातील सरकार गरिबांचे नाही, धनदांडग्यांचे, राहुल गांधी यांची टीका

निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. कोरोना काळात देशभरात लोक मरत होते त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी थाळ्या वाजवत होते, मोबाईलची लाईट पेटवत होते. मोदी गॅरंटी म्हणजे अदानी गॅरंटी आहे. नोटाबंदी करून देशातील छोटय़ा व्यापाऱयांना-व्यावसायिकांना देशोधडीला लावले. देशभरात जीएसटी लागू केल्यानंतर देशातील शेतकऱयांना टॅक्स द्यावा लागत आहे, केंद्रातील सरकार हे गरीबांचे सरकार नसून ते धनदांडग्यांचे सरकार आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पेंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला केला. ते राजस्थानमधील चुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.


राजस्थानात आम्ही गरीबांचे सरकार चालवत आहोत. आम्ही आमची सुरक्षा करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेत मोदी गॅरंटी बोलतात, परंतु यावर लोक आता हसत आहेत. मोदींनी 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनांचे पुढे काय झाले? मोदींच्या गॅरंटीचा अर्थ म्हणजे अदानींची गॅरंटी आहे. काँग्रेसच्या सरकारचा अर्थ शेतकरी आणि मजदूर यांचे सरकार आहे. तुम्हाला अदानी यांचे सरकार हवे की शेतकरी, मजदूर आणि तरुणांचे हे तुम्ही ठरवा. राजस्थानात काँग्रेसच्या सरकारने लोकांसाठी खूप काम केले आहे. जर भाजपचे सरकार सत्तेत आले तर ते फक्त उद्योगपतींसाठी काम करील, असे राहुल गांधी म्हणाले.


मोदी अदानींची मदत करत आहेत

अदानी हे काही ना काही बिझनेस करीत आहेत. हवाई अड्डे, बंदर, सिमेंट प्लाण्ट, रस्ते… सर्व त्यांच्याकडे आहे. ते (पंतप्रधान मोदी) श्रीमंतांसाठी काम करीत आहेत. ते अदानींची मदत करीत आहेत. अदानी पैसा कमवतात. तो पैसा परदेशात वापरला जातो. पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायदा आणला आणि म्हटले की, या कायद्यामुळे शेतकऱयांचा फायदा होईल, परंतु देशात सर्व शेतकरी याविरोधात एकवटले व आंदोलन केले. शेतकऱयांनी सांगितले की, हा कायदा आमचा नाही. अदानींचा आहे. शेवटी काँग्रेसने शेतकऱयांसोबत मिळून हा कायदा पळवून लावला, असे राहुल गांधी म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.