Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नेपाळमधील लोक दिवाळीत कुत्र्याची पूजा का करतात? कुत्र्यांना देतात स्पेशल नैवेद्य

नेपाळमधील लोक दिवाळीत कुत्र्याची पूजा का करतात? कुत्र्यांना देतात स्पेशल नैवेद्य 


भारतात दिवाळीची जितकी क्रेझ आहे तितकी क्वचितच इतर कोणत्याही सणाला असेल. इथे चार दिवस दिवाळी साजरी होते. म्हणजे काय, धनत्रयोदशी, छोटी दिवाळी, मोठी दिवाळी, सगळे मिळून चार-पाच दिवस लागतात. शेजारील देश नेपाळमध्ये दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. येथे लोक कुत्र्यांची पूजा करून दिवाळी साजरी करतात.

तिहार म्हणजे काय?

नेपाळमध्ये दिवाळीला तिहार म्हणतात. हे तिहार इथे दिवाळीसारखीच साजरी केली जाते. लोक दिवे लावतात. नवीन कपडे घालतात. पण दुसऱ्याच दिवशी दुसरी दिवाळी साजरी होते. त्याला कुकुर तिहार म्हणतात. या दिवशी नेपाळमध्ये कुत्र्यांची पूजा केली जाते.

फुलांचा हार आणि कुंकू

हा उत्सव ५ दिवस चालतो. या काळात लोक वेगवेगळ्या प्राण्यांची पूजा करतात. गाय, कुत्रा, कावळा, बैल आदींची पूजा केली जाते. तिहारच्या दिवशी कुकुरची म्हणजे कुत्र्यांचा सन्मान केला जातो. त्यांना फुलांचे हार घातले जातात. त्यांना टिळा लावून सन्मानाची वागणूक दिली जाते.

कुत्र्यांना असतो स्पेशल नैवेद्य 

कुत्र्यांनाही खाण्यासाठी दही दिले जाते. याशिवाय अंडी आणि दूधही त्यांना खायला दिले जाते. कुत्रे कायम सोबत राहावेत अशी लोकांची इच्छा असते. कारण, कुत्रा हा प्रामाणिक प्राणी असून तो वेळोवेळी आपल्या मदतीला धावून येतो.

हा सण का साजरा केला जातो?

नेपाळमधील लोकांची श्रद्धा अशी आहे की, कुत्रे हे यमाचे दूत आहेत. नेपाळमध्ये असेही मानले जाते की कुत्रे मृत्यूनंतरही तुमचे रक्षण करतात. त्यामुळे त्यांची पूजा केली जाते. हा सण प्राण्यांसाठी संदेश देतो. या दिवाळीत तुम्ही भटक्या कुत्र्यालाही खायला घालू शकता.  कुत्र्यांची पूजा केल्याने, कुत्र्यांना हवं तो नैवेद्य अर्पण केल्याने पुण्य कमावता येते, अशीही लोकांची समजूत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.