Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उद्धव ठाकरे यांनी घेतले केदारनाथ, बद्रीनाथाचे दर्शन

उद्धव ठाकरे यांनी घेतले केदारनाथ, बद्रीनाथाचे दर्शन


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केदारनाथ आणि बद्रीनाथाचे सहकुटुंब दर्शन घेतले. त्यांच्यासोबत सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे होते. उद्धव ठाकरे उत्तराखंडमध्ये असून शुक्रवारी सकाळी त्यांनी केदारनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते बद्रीनाथ धाम येथे पोहचले. त्यांनी सहकुटुंब बद्रीनाथाचे दर्शन घेऊन पूजाअर्चा केली.

- चारधाम यात्रेची लवकरच सांगता होणार आहे. गंगोत्री धामचे दरवाजे 14 नोव्हेंबर रोजी तर यमुनोत्री धामचे दरवाजे 15 नोव्हेंबर रोजी बंद होणार आहेत. सर्वात शेवटी 18 नोव्हेंबर रोजी बद्रीनाथ धामचे दर्शन बंद होईल. त्यामुळे येथे यात्रेकरूंचा ओघ वाढला आहे. नेपाळचे राजदूत शंकर प्रसाद शर्मा केंद्रीय निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडेय यांनीही शुक्रवारी बद्रीनाथाचे दर्शन घेतले.


- बद्रीनाथाची विशेष पूजा संपन्न झाल्यानंतर बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे उपाध्यक्ष किशोर पवार यांनी बद्रीनाथ धामचा प्रसाद उद्धव ठाकरे यांना दिला. सिंहद्वारावर उद्धव ठाकरे यांचे शाल देऊन मंदिर समितीच्यावतीने स्वागत करण्यात आले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.