Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली वरून निघालेल्या शहीद दौड पर्व तिसरेची सांगता मुंबई गेट वे ऑफ इंडिया येथे देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते संपन्न

सांगली वरून निघालेल्या  शहीद दौड पर्व तिसरेची सांगता मुंबई गेट वे ऑफ इंडिया येथे देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते संपन्न

मुंबई : २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सांगलीतून शहीद अशोक कामटे स्मुर्ति फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी ४७० किमी अल्ट्रा  रण शहीद दौडचे आयोजन केले जाते. यावर्षी या दौड चे हे तिसरे पर्व आहे. ही दौड सांगलीतील शहीद कामटे चौकातून मशाल व तिरंगा ध्वज घेवून सोमवार २०/११/२०२३ रोजी सकाळी तासगाव, विटा, पुसेसावळी, सातारा, पुणे, मारुंजी, खोपोली, पनवेल, माटुंगा मार्गे गेट वे ऑफ इंडिया येथे रविवार दिनांक २६/११/२०२३ रोजी सकाळी ०८:३० वाजता पोहचली. 

शहिदांना अभिवादन करण्यासाठी काढण्यात येणारी ही देशातील एकमेव दौड आहे. रविवार २६ नोव्हेंबर २०२३ रोजी या दौडीची सुरुवात अपर पोलीस महासंचालक ( वाहतूक) रविंदर सिंगल यांनी  धावपटुंसोबत शहीद तुकराम ओंबळे स्मारक ते गेट  वे ऑफ इंडिया पर्यंत धावून केली. दौडीतील धावपटूंचे  स्वागत व कौतुक प्रमाणपत्र आणि मेडल गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देवून गौरव करण्यात आला. यावेळी धावपटुंचे सर्व मान्यवरांनी तोंडभरून कौतुक व पाटीवर शाबासकीची थाप दिली. तसेच या दौडीची सांगता गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पालकमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री उपनगर मुंबई मंगल प्रभात लोढा, विशेष पोलीस महानरीक्षक यशस्वी यादव, डीसीपी डॉ .प्रवीण मुंडे, पोलीस बॉईज संघटना अध्यक्ष राहूल दुभाले, डेप्युटी कमिशनर कस्टम सोहेल काजी, ईश्वर ढींग्रा, ज्योतिरादित्य कोरे,   कामटे फाउंडेशनचे अध्यक्ष समित दादा कदम व विश्वगंधा  कदम यांच्या हस्ते करण्यात आली.    शहिदांना अभिवादन कार्यक्रम पार पडणार आहे.
    
या ४७० किमी दौडमध्ये शहीद मॅरेथॉनचे ३० धावपटू सहभागी झाले होते. तर  या मुंबईपर्यंत धावत जाणाऱ्या अल्ट्रा रनर्सना प्रोत्साहन देण्यासाठी सांगली,विटा, सातारा, पुणे, पनवेल, मुंबईतील विविध पोलीस अधिकारी, कर्मचारी,संस्था, मंडळे व खेळाडूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्याबरोबर ५ किमीची लोकल दौड धावून प्रोत्साहन दिले. आयोजित शहीद दौडीत हजारो लोकांनी धाव घेत एकीचे दर्शन घडविले. २६/११ शहीद दौड मध्ये फाऊंडेशनचे पुढील खेळाडू धावले आहेत.१) स्वप्नील माने, २) आदित्य लोखंडे, ३) जयदिप घार्गे,४) प्रतिक नलवडे, ५) वैभव आटुगडे, ६) सेहवाग गोसावी, ७) प्रितम सुतार,८) एकलव्य हाबळे, ९) संग्राम शिंदे, १०) आदित्य पवार,११) राज मोरे, १२) आदिनाथ यादव, १३) विश्वनाथ सुर्यवंशी, १४) इरफान जमादार, १५) आदर्श सपकाळ,१६) निशांत जाधव, १७) हुसेन जमादार, १८) किशोर देसाई, १९) चंद्रकांत निवर्गी, २०) अजय मोरे, २१) शितल पाटील, २२) आकाश मोरे, २३) सर्वजित पाटील, २४) सुशांत मोरे, २५) चैतन्य कदम, २६) अक्षय पाटील, २७) मयुर लोंढे, २८) रोहीत लांडगे,२९) प्रमोद लोंढे ३०) सनी कांबळे, ३१) राहूल टोमके 
              
तरी  "शहीद दौड" च्या आयोजन कामी द शहीद दौड-२०२३ टिम व फाऊंडेशनचे अध्यक्ष समित कदम, फाऊंडेशनचे सचिव ईनायत तेरदाळकर, घनःशाम उके शहीद मॅरेथॉनचे रेस डायरेक्टर डॉ चंद्रशेखर हळींगळी, समन्वयक योगेश रोकडे, देवदास चव्हाण, पै. अभिजीत पाटील, संतोष जाधव, निलेश मिसाळ, अभिजीत भोईटे, ललीत छाजड, सचिन खोंद्रे, नाना शिंदे, पवन कुंभार, पृथ्वी घाटगे, प्रदिप सुतार, विरेन हळिंगळे, दिपक पाटील, पुषण चिकली, सुधिर भगत, उमेश गुड्डी, अमित सोणावणे, विनायक कवडे, हिना पठाण, राहूल लोखंडे, संतोष  मोहंती, संभाजी लोखंडे, सिद्धार्थ पाटणकर, उदयकुमार नलवडे, दीपक इंगळे, स्वप्निल माने, जयदीप घारगे, आदित्य लोखंडे, प्रतीक नलावडे, वैभव आटुगडे हे परिश्रम घेत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.