Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

समतेला विरोध करणारे सत्तेवर! महिलांना सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठेपासून लांब ठेवणारे देशद्रोही: लता भिसे.

समतेला विरोध करणारे सत्तेवर! महिलांना सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठेपासून लांब ठेवणारे देशद्रोही: लता भिसे.

सांगली माणूस म्हणून जगण्यासाठी समतेचे वातावरण निर्माण करणारे संविधान व लोकशाही मूल्य जनमानसात रुजवण्याचे कार्य व राजकीय निर्णय प्रक्रियेत महिलांना स्थान मिळवून देणारी, हक्कासाठी बोलणारी चळवळ म्हणून भारतीय महिला फेडरेशन कार्य करीत आहे. भाजी घेताना दहा वेळा विचार करतो. आत्ता पुन्हा देश कुणाच्या हातात देणार याचा विचार करा! असे आवाहन फेडरेशनच्या राज्यसचिव लता भिसे यांनी केले.

कामगार भवन येथे आयोजित भारतीय महिला फेडरेशनच्या सांगली जिल्हा अधिवेशनात मार्गदर्शन करत असताना श्रीमती भिसे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ. मीनाक्षी कांबळे व स्वागत अध्यक्ष तेजस्विनी सूर्यवंशी होत्या. अधिवेशनात वाढती महागाई, शिक्षणाचे खाजगीकरण, नोकऱ्यांचे कंत्राटीकरण ,मुला मुलींचे मोफत शक्तीचे शिक्षण, निराधार विधवा बेघरांना पेन्शन, भूमिहीनांना घरकुल, रेशनवर रास्त दरात धान्य व बचत गटाच्या नावाखाली आधुनिक सावकारी करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्या इत्यादी विषयांच्यावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले तसेच जिल्हा कार्यकारणी निवडण्यात आली. यावेळी कॉ.नीलम जगताप, कॉ. नंदकुमार हत्तीकर, शबाना शेख, वर्षा गडचे, परशुराम कुंडले, रमेश सहस्रबुद्धे, एड. अजितराव सूर्यवंशी, भाई दिगंबर कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. स्वाती पवार, प्रतिभा पवार, हिना मुल्ला, पुष्पा कुंडले, अंजना मोहिते, सुवर्णा मलमे, सतीश लोखंडे उपस्थित होते. आभार विजय बचाटे यांनी मानले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.