Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भूमी अभिलेखमध्ये एजंट, झिरो कर्मचाऱ्यांचा वावरकॉंग्रेस कार्यकारिणी सदस्य अशोक मासाळे यांचा आरोप

भूमी अभिलेखमध्ये एजंट, झिरो कर्मचाऱ्यांचा वावरकॉंग्रेस कार्यकारिणी सदस्य अशोक मासाळे यांचा आरोप


सांगली :  येथील भूमी अभिलेख कार्यालयात सध्या सावळा गोंधळ सुरू असून एजंट आणि झिरो कर्मचाऱ्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. अतिमहत्त्वाचे रेकॉर्ड सुरक्षित नाही. या विभागाच्या गलथान कारभाराची चौकशी करून  सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून द्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे  जिल्हा कार्यकारिणी सदस्य आणि अण्णा फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक मासाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सांगली येथील भूमी अभिलेख कार्यालयात सध्या अनागोंदी कारभार सुरू आहे. या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याचा फायदा घेऊन या कार्यालयात एजंटगिरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याबरोबरच झिरो कर्मचाऱ्यांच्या हातात या कायालयाचा संपूर्ण  कारभार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या कामाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. अति महत्त्वाचे रेकॉर्ड सध्या सुरक्षित  नसल्याची जाणीव होत आहे. अनेक महत्त्वाची कागदपत्रे झिरो कर्मचारी  व एजंटाच्या हातात दिसून येतात. पैसे मोजल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. अशी या कार्यालयात सध्या स्थिती आहे.

अनेक मिळकतधारकांच्या जागा मोजणीचे अर्ज महिनो नि महिनो पडून आहेत.अनेक कामांना  जाणिवपूर्वक विलंब लावला जातो,कधी काप्युटर बंद आहे,तर कधी सर्व्हर डाऊन आहे, अशी कारणे देऊन मिळकतधारकांना हेलपाटे मारायला भाग पाडले जात आहे. त्यामुळे या कार्यालयाच्या कारभार तातडीने सुधारण्यासाठी  तातडीने उपाययोजना राबवावी व सामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही मासाळे यांनी या निवेदनात दिला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.