अण्णा फौंडेशनतर्फे मनपा शाळेतील विद्याथ्यार्ना गणवेश वाटप
सांगली : सांगली शहर-जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस, अण्णा फौंडेशनचे अध्यक्ष अशोक मासाळे आणि टिंबर एरिया पतसंस्थेतर्फे महापालिका शाळेतील गरीब, गरजू विद्यार्थ्याना गणवेश वाटप करण्यात आले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गरीब, गरजू विद्यार्थ्याना शाळांच्या मागणीनुसार गणवेश वाटप केल्याने मासाळे यांचे कौतुक केले जात आहे.
श्री. मासाळे यांनी कॉंग्रेससह अण्णा फौंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. गोरगरिबांना मदत करण्यात मासाळे यांच्यासह त्यांचे अण्णा फौंडेशन नेहमीच अग्रेसर असतात. सांगलीतील मनपा शाळा क्र. ३८ आणि २२ येथील विद्यार्थ्याना शालेय गणवेशाची कमतरता भासत असल्याचे तेथील मुख्याध्यापकांनी मासाळे यांना सांगितले होते. त्यानंतर त्यांनी तातडीने विद्याथ्यार्ना गणवेश वाटप केले.
यापुढेही गरीब, गरजू विद्यार्थी नागरिक यांच्यासाठी असेच सामाजिक उपक्रम राबवले जातील असे यावेळी श्री. मासाळे यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती माळी, अक्षय मासाळे, अमर निंबाळकर, सचिन आरवाळे, बाजीराव गस्ते, टिंबर एरिया पतसंस्थेचे श्री. कोहली, आशिष चौधरी यांच्यासह अण्णा फौंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.