Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हायनांच्या कळपाने सिंहिणीला घेरून केला जबर हल्ला; पण शेवटी वेगळाच ट्विस्ट; व्हिडिओ पहा

हायनांच्या कळपाने सिंहिणीला घेरून केला जबर हल्ला; पण शेवटी वेगळाच ट्विस्ट; व्हिडिओ पहा

नवी दिल्ली 06 नोव्हेंबर : सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं, तो एवढा ताकदवान आहे की तो कोणत्याही प्राण्याला किंवा माणसाला एका क्षणात मारून टाकू शकतो. तरीही अनेकदा असंही पाहायला मिळतं, की तो शिकार करत नाही. शिकार करण्याचं काम सिंहिणीचं आहे. त्या शिकार शोधत जंगलात फिरतात आणि मग त्यांना पकडतात. मात्र, शिकार करताना अनेकवेळा त्या स्वतःच अडकतात, त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सिंहिणीचा जीव धोक्यात आल्याचं दिसत आहे.

खरं तर, सिंहीण हायनांच्या कळपात अडकते. त्यानंतर हायना तिच्यावर अशा प्रकारे हल्ला करतात, जसं मुंग्या साखरेच्या दाण्यावर हल्ला करतात. ते सिंहीणीला आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न करत असतात. इतक्यात अचानक सिंहिणींचा एक गट येतो आणि त्यानंतर असंदृश्य दिसतं, जे तुम्ही याआधी कधीच पाहिलं नसेल. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की सिंहिणींच्या एका गटाने हायनांच्या गटावर कसा हल्ला केला. मग सर्व हायना तिथून विजेच्या वेगाने पळून गेले.

सर्व सिंहीणांनी मिळून दाखवून दिलं की जर कोणी आपल्या जोडीदाराला हात लावण्याचा प्रयत्न केला तर ते एकत्र येऊन त्याचा सामना करतील. म्हणूनच एकात्मतेतच ताकद असते असे म्हणतात. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Rainmaker1973 या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 31 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 4.8 दशलक्ष म्हणजेच 48 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 53 हजारांहून अधिक लोकांनी लाईकही केला आहे.

त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, 'एकता खूप महत्त्वाची आहे'. दुसऱ्या यूजरने लिहिलं आहे की, 'हे दृश्य पाहून माझ्या हृदयाचे ठोके वाढले', तर काही यूजर्स असेही म्हणत आहेत की 'निसर्ग खरोखर खूप क्रूर आहे.'


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.