Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विट्याजवळ अट्टल चोरट्यास अटकसाडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, एलसीबीची कारवाई

विट्याजवळ अट्टल चोरट्यास अटकसाडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, एलसीबीची कारवाई 

सांगली :  सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. 

इब्राहिम अब्बास अली शेख (वय २४, रा. कराड, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. जिल्ह्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी निरीक्षक श्री. शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक तयार केले होते. या पथकाला चोरीतील संशयितांना पकडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पथक चोरट्यांचा शोध घेत होते.

पथक विटा परिसरात गस्त घालत असताना कराड येथील इब्राहिम शेख चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी विटा येथे येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. कराड-कडेगाव रस्त्यावरील खंबाळे फाट्याजवळ पथकाने सापळा रचला होता. संशयित तेथे दुचाकीवरून आल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ रोकड तसेच पिशवीत सोन्या-चांदीचे दागिने सापडले. त्याबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने सोनकिरे येथे तसेच विटा येथे घरफोडी करून तेथून दागिने लंपास केल्याची कबुली दिली. त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १ लाख ९८ हजारांचे सोन्याचे दागिने, ३० हजारांचे चांदीचे दागिने, ६० हजारांची रोकड, दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. त्याला विटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, अरूण पाटील, कुबेर खोत, अभिजित ठाणेकर, रोहन घस्ते, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.