Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्मवीर पतसंस्था म्हणजे कर्मवीर भाऊराव आण्णांच्या नावाला साजेशी कर्तबगारी.पाडव्याला एक हजार कोटी ठेवींचे उद्दीष्ट पुर्ण ; चेअरमन श्री. रावसाहेब पाटील

कर्मवीर पतसंस्था म्हणजे कर्मवीर भाऊराव आण्णांच्या नावाला साजेशी कर्तबगारी.पाडव्याला एक हजार कोटी ठेवींचे उद्दीष्ट पुर्ण ; चेअरमन श्री. रावसाहेब  पाटील


सांगली :- कर्मवीर पतसंस्थेने सभासदांचा विश्वास ठेवीदारांच्या हिताच्या ठेव योजना कर्जदारांना त्यांच्या गरजेच्यावेळी कर्जपुरवठा करून सभासदांचा विश्वास संपादन केला असून सभासदांच्या या विश्वासाच्या बळावर संस्थेने दिपावली पाडव्याला रु. १०१ कोटी ठेवी पर्यंत मजल मारुन उद्दीष्टापेक्षा रु. १ कोटी जास्तीच्या ठेवी जमा केल्या आहेत. यातून सभासदांनी आम्हाला दिपावलीच्या भरभरून शुभेच्छा दिल्याची आनंददायी भावना कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी व्यक्त केली व या विश्वासाबद्दल त्यांनी सर्व सभासदांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून त्यांना पुन्हा एखदा शुभेच्छा दिल्या आहेत.

३५ वर्षाची पतसंस्था, बिनविरोध संचालक मंडळ निवडीची लोकशाही परंपरा सतत ऑडीट वर्ग अ. सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात ६२ हजाराहून अधिक सभासद ठेवीवर आकर्षक व्याजदर कर्जावर रास्त व्याजदर भरघोष लाभांश भक्कम आर्थिक स्थिती स्वच्छ आणि पारदर्शी कारभार संस्थेसाठी सतत क्रियाशील असणारे संचालक मंडळ आणि अत्यंत तत्पर सेवाभावी सेवकवर्ग यातून हजारो सभासदांच्या संसाराला व्यापार उदिमाला हातभार लावणारा कर्मवीर पतसंस्थेचा वटवृक्ष विस्तारला आहे. यामुळेच पाडव्याच्या शुभदिनी एक हजार कोटी ठेवींचे उद्दीष्ट पुर्ण करत केवळ सहकार क्षेत्रालाच नव्हे पुरोगामी महाराष्ट्राला भूषणावह काम केले आहे. येत्या दोन वर्षात संस्था २ हजार कोटी ठेवींचे उद्दीष्ट पुर्ण करेल असा विश्वास चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी व्यक्त केला.

सांगली कोल्हापूर व सातारा जिल्हा कार्यक्षेत्र ६० शाखांतून आधुनिक कामकाज करत सभासदांना बचतीची सवय लावून त्यांना स्वयंपूर्व बनविणे आणि गरजूंना कर्ज देवून अनेक सक्षम संसार कर्मवीर पतसंस्थेच्या माध्यमातून उभे राहिले आहेत. सामाजिक कार्यात ही संस्थेने मोलाचे योगदान दिले आहे. या सर्वातून कर्मवीर पतसंस्थेवर सभासदांचा विश्वास वृध्दींगत झाला आहे.

कर्मवीर पतसंस्थेने मागील पाच वर्षात प्रगतीचा आलेख सतत चढता ठेवला आहे. प्रत्येक वर्षी संस्थेने सर्वच बाबतीत ३५ टक्के पर्यंत वाढीचा वेग ठेवला आहे. ६० शाखांमधुन सभासदांनी संस्थेच्या प्रत्येक योजनेचे भरभरून स्वागत केले. तसेच पतसंस्थेचे संचालक मंडळ देखील संस्थेला आधुनिक तंत्रज्ञानासोबत आपलेपणाची सेवा देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यास संस्थेच्या सेवकांनी चांगली साथ दिली आहे. असा सर्व घटकांचा उत्तम मिलाफ कर्मवीर पतसंस्थेच्या कार्यात दिसत आहे.

यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक सकळे. संचालक अॅड. एस. पी. मगदूम, डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. ओ. के. चौगुले (नाना) डॉ. एस. बी. पाटील (मोटके) डॉ. चेतन पाटील संचालिका श्रीमती भारती चोपडे सौ. चंदन केटकाळे तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे श्री. लालासो भाऊसो थोटे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदुम यांच्यासह संस्थेचे सेवक उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.