Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

''जय जवान मरो किसान'' भारतीय रेल्वेने केला ब्रीद वाक्यात बदल

''जय जवान मरो किसान'' भारतीय रेल्वेने केला ब्रीद वाक्यात बदल 


वसगडे ; नोव्हेंबर 2022 पासून  रेल्वे प्रशासन ,महसूल विभाग , सरकार विरोधात आपल्या हक्कासाठी भांडत असताना शेतकऱ्याला नोव्हेंबर 2023 मध्ये मरणासाठी आज " जलसमाधी " घेण्याची वेळ आज आली आहे.


सप्टेंबर महिन्यामध्ये रेल्वेने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत बळकावलेल्या शेतकऱ्यांच्या 310 गुंठ्यामधील जमिनीमध्ये बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन केले आंदोलनामध्ये " महाराष्ट्र एक्सप्रेस " 5 तास थांबली त्यामुळे सर्व महाराष्ट्रतील शेतकऱ्यांच्या वर होत असल्या आंदोलनाची माहिती सर्वांना मिळाली

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत मा. विभागीय आयूक्त साहेब , मा. डिआरएम मॅडम , मा. खासदार संजयकाका पाटील , मा. आमदार डाॅ.विश्वजीत पंतगराव कदम , मा.जिल्हाधिकारी  राजा दयानिधी ,मा. उपजिल्हाधिकारी विकास खरात ,प्रांतधिकारी कडेगाव  , तहसिलदार पलूस व सर्व शेतकरी उपस्थित होते.... यामध्ये 

भुसंपादनचा विषय मार्गी लागला 
1) एकतर सर्व अतिक्रमण केलेली जमीन संपादित करावी ..नाही तर रेल्वेचे पोल काढून घ्यावेत 
2) ड्रेनेज व्यवस्था 1 महिन्यात करून घ्यावे 
3) दुसऱ्या बाजूचे अतिक्रमण केबल अतिक्रमण त्वरित काढून घ्यावे


या मीटिंगमध्ये ठरल्यानुसार 15 नोव्हेंबर 2023 च्या आत रेल्वेने शेतकऱ्यांच्या हद्दीतील घेऊन गेलेल्या जमिनीतील खड्डे मुजवून ड्रेनेजची व्यवस्था करून द्यायची फक्त सूचना उपायुक्त साहेबांनी दिली परंतु रेल्वेने त्यांच्या सूचने च्या कागदाला " केराची टोपली"  दाखवत काहीही काम केले नाही उलट रेल्वे हा रस्ता करू शकत नाही असे पत्र कलेक्टर साहेबांना दिले कारण हायस्पीड रेल्वे शेजारी रस्ता होऊ शकत नाही पूर्ण भारतभर रेल्वे ट्रॅक शेजारी रस्ते आहेत जवळच्या सातारा जिल्ह्यामध्ये रस्ते रेल्वेने केले आहेत जवळच्या नदीच्या पलीकडे " नांद्रे "  गावामध्ये रस्ता करून देतो असं लिहून दिल आहे परंतु वसगडे येथील शेतकऱ्यांना त्रास वसगडे येथील एकूण 4 भागातील रस्त्यामध्ये 2 भागात रस्ता रेल्वेने केला आहे आणि इतर 2 भागात रेल्वे अशी उडवा ऊडवीचे उत्तरे रेल्वे प्रशासन अगदी दिमाखात देत आहे भारतीय संविधान कलम 300A, नवीन भूसंपादन कायदा 2013  नूसार कोणत्याही शेतकर्याची शेतजमीन विना संपादन ताब्यात घेता येत नाही तरी देखील गेली 2 वर्षा पासून रेल्वे विभागाने विना मोबदला  ताब्यात घेतली आहे .

 याउलट स्वताच्या मालकिच्या शेतजमिनीमध्ये शेतकरी बसले असता त्याच्यावरच गुन्हे नोंद रेल्वे पोलीसानी करून शेतकर्यांना देशोधडीला लावले आहे. महाराष्ट्र सरकार आम्ही कसे म्हणायचे आज रोजी ऊस हंगाम चालू झाला आहे कारखान्यापर्यंत जाण्यासाठी कोणतीच उपाययोजना नाही त्यामुळे बाधित सर्व शेतकरी उद्या नदीमध्ये सहकुटुंब जलसमाधी घेणार आहेत वसगडे येथील सर्व शेतकरी बांधवांनी या आंदोलनात आपला सहभाग दाखवावा ही नम्र विनंती.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.