Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कृष्णापात्रात कोयना धरणातून विसर्ग करण्यासंदर्भात जिल्हा अधिकारी यांना दिले निवेदन;मनोज भिसे(सामाजिक कार्यकर्ते)

कृष्णापात्रात कोयना धरणातून विसर्ग करण्यासंदर्भात जिल्हा अधिकारी यांना दिले निवेदन;मनोज भिसे(सामाजिक कार्यकर्ते)


कृष्णा नदीमध्ये कोयना धरणातून केला जाणारा विसर्ग हा गेल्या चार दिवसांपासून बंद करण्यात आल्याने पुन्हा एकदा कृष्णा नदी पात्र कोरडे पडून नदी काठावरील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. कृष्णा नदीचे पात्र हे काही ठिकाणी कोरडे पडू लागले आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या काही दिवसांपूर्वी कालवा समितीची बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये कृष्णा नदी पात्रात पाणी सोडण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला असून, सदर प्रस्तावावर सांगली,कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आपल्या स्वाक्षऱ्या करून मंजुरी दिली. परंतु सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी आजही त्यावर स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे कृष्णा काठावरील लोकांच्यासह पशुधनाच्या नरड्याला कोरड पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
    
कोयना धरणामध्ये वीज निर्मिती साठी लागणारे पाणी कमी करून ते पाणी कृष्णा नदीमध्ये सोडण्यात यावे,तसेच साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांची कालवा समितीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी घेण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून पाठपुरावा करण्यात यावा. अशी मागणी मी आपणाकडे करत आहे.
       
आपण या संदर्भात पाठपुरावा करून कृष्णा काठावरील लोकांची होणारी गैरसोय टाळाल ही अपेक्षा! यावेळी निवेदन देताना शिवाजीराव पाटील टिपू भाई इनामदार विजय कोळेकर आदी उपस्थित होते 



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.