Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

घृणास्पद ! पाच दिवस ते तिच्या शरीराचे लचके तोडत राहिले ! पुण्यातील धक्कादायक प्रकार

घृणास्पद ! पाच दिवस ते तिच्या शरीराचे लचके तोडत राहिले ! पुण्यातील धक्कादायक प्रकार


पुणे  : ती मूळची छत्तीसगडची.. प्रेमाच्या आणाभाका घेत तिला लग्नाचे प्रलोभन दाखवून तिचा मित्र पुण्यात घेऊन आला. रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर तिच्यावर रेल्वे सुरक्षा दलातील एका वासनांध कर्मचार्‍याची नजर पडली.

त्याने दोघांना ताडीवाला रोड येथील रेल्वे कॉलनीतील एका खोलीत डांबले. त्यानंतर तब्बल चार ते पाच दिवस त्याने आणि त्याच्या साथीदाराने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत शरीराचे लचके तोडले. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना पुण्यात घडली आहे. प्रेमप्रकरणातून छत्तीसगडमधून मित्रासोबत पळून आलेल्या अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलातील (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) हवालदार आणि त्याच्या साथीदाराने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हवालदाराच्या साथीदारास पुणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. कमलेश तिवारी (मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर रेल्वे सुरक्षा दलातील (आरपीएफ) हवालदार अनिल पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार पसार झाला असून, त्याचा लोहमार्ग पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. याबाबत एका अल्पवयीन मुलीने पुणे रेल्वे स्थानक लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. दोघे जण मूळचे छत्तीसगडमधील आहेत. दोघे जण छत्तीसगडमधून पसार झाले. त्यानंतर मुलीच्या पालकांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार छत्तीसगडमधील स्थानिक पोलिस ठाण्यात दिली होती. छत्तीसगडमधील स्थानिक पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या प्रियकराविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गेल्या महिन्यात मुलगी आणि तिचा मित्र पुणे रेल्वे स्थानकात सापडले. 

मुलगी अल्पवयीन असल्याने रेल्वे सुरक्षा दलाने तिला एका संस्थेत ठेवले. संबंधित संस्था ताडीवाला रस्ता भागात असून, या संस्थेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाकडे आहे. पुणे रेल्वे स्थानकात सापडलेल्या अल्पवयीन मुलांना या संस्थेत दाखल करण्यात येते. मुलांच्या पालकांचा शोध घेऊन याबाबतची माहिती पालकांना देण्यात आली. अल्पवयीन मुलीवर संस्थेतील कर्मचारी तिवारी आणि हवालदार पवार यांनी वारंवार बलात्कार केला. 

तब्बल चार ते पाच दिवस हा प्रकार सुरू होता. याच काळात मुलीच्या मित्राकडून काही पैसेदेखील या दोघांनी उकळल्याचे समजते. दरम्यान, अल्पवयीन मुलगी सुखरूप सापडल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलातील अधिकार्‍यांनी छत्तीसगड पोलिसांना दिली. छत्तीसगड पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन तिला पालकांच्या ताब्यात दिले. मुलीची चौकशी करण्यात आली. तेव्हा रेल्वे सुरक्षा दलातील हवालदार पवार आणि संस्थेतील कर्मचारी तिवारीने बलात्कार केल्याची माहिती दिली. त्यानंतर याप्रकरणी छत्तीसगडमधील स्थानिक पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित गुन्हा पुणे रेल्वे स्थानक पोलिस ठाण्याकडे तपासासाठी सोपविण्यात आल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र गायकवाड आणि पथकाने तातडीने तपास सुरू केला. तिवारीला अटक करण्यात आली असून, लोहमार्ग पोलिस दलातील उपविभागीय अधिकारी देवीकर तपास करत आहेत.

‘आरपीएफ’मधील हवालदार निलंबित

छत्तीसगडमधून प्रियकरासोबत पळून आलेल्या मुलीवर बलात्कार करणारा रेल्वे सुरक्षा दलातील हवालदार अनिल पवारला निलंबित करण्यात आले असून, तो पसार झाला आहे. हवालदार पवार याचा शोध घेण्यात येत आहे.

याबाबत रेल्वे सुरक्षा दलातील (आरपीएफ) हवालदार अनिल पवार आणि कमलेश तिवारी या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिवारी याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
– राजेंद्र गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोहमार्ग पोलिस ठाणे

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.