Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दोनवडेजवळ गोवा बनावटीची दारू जप्त८४ लाखांचा मुद्देमाल जप्त, उत्पादन शुल्कची कारवाई

दोनवडेजवळ गोवा बनावटीची दारू जप्त८४ लाखांचा मुद्देमाल जप्त, उत्पादन शुल्कची कारवाई


कोल्हापूर : कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर दोनवडे येथे बसस्थानकाजवळ गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा कंटेनर पकडण्यात आला. यावेळी दारूचे १२०० बॉक्स तसेच कंटेनर असा ८४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गोव्यातील दोघांना अटक करण्यात आली. तर सावंतवाडी येथील दोघेजण पसार झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे कोल्हापूरचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी दिली. 

दीपक प्रकाश पोवार (वय ३२), रिझवान सुलेमान शेख (वय ३३, दोघेही रा. मडगाव, गोवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अजय सूर्यकांत कवटणकर, विवेक गुंडू मडुरकर (दोघेही, रा. सावंतवाडी) अशी पसार झालेल्यांची नावे आहेत. गोव्याहून मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होत असल्याने कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांनी यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्याचे भरारी पथक दारू तस्करांच्या मागावर होते. गुरुवारी पहाटे गोव्याहून दारू घेऊन एक कंटेनर गगनबावडामार्गे येणार असल्याची माहिती अधीक्षक श्री. आवळे यांना मिळाली होती. त्यांनी भरारी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. 

माहितीप्रमाणे भरारी पथकाने कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावरील दोनवडे येथील बसस्थानक परिसरात सापळा रचला होता. मिळालेल्या माहितीनुसार कंटेनर आल्यानंतर पथकाने तो अडवला. कंटेनरची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूचे १२०० बॉक्स सापडले. याबाबत पोवार आणि शेख यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी कवटणकर आणि मडुरकर यांच्या सांगण्यावरून ही दारू आणल्याची कबुली दिली. त्यानंतर पोवार आणि शेख यांना अटक करण्यात आली. यावेळी पथकाने गोवा बनावटीची दारू, कंटेनर असा ८४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक रवींद्र आवळे, उपअधीक्षक राजाराम खोत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक जी. बी. कर्चे, विजय नाईक, व्ही. एम. माने, एस. टी. कुमरे, सचिन लोंढे, राजेंद्र कोळी, विशाल भोई, मारूती पोवार, साजीद मुल्ला आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.