Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

थकबाकीपोटी तीन दुकान गाळे सिल ; महापालिकेकडून गावभागात कारवाई


थकबाकीपोटी तीन दुकान गाळे सिल 
 महापालिकेकडून गावभागात कारवाई

 घरपट्टी थकबाकी पोटी महापालिकेच्या घरपट्टी वसुली पथकाने गावभाग येथील तीन दुकान गाळे सील केले आहे. आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या आदेशानुसार आणि उपआयुक्त पंडित पाटील तसेच सहा आयुक्त ,कर निर्धारक व संकलक नितीनकाका शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

 गावभागात रणझुंझार चौक येथील वृषाली पॅराडाईजमध्ये अरविंद शिंदे आणि कोलप यांच्या मालकीचे तीन दुकान गाळे आहेत. या दुकान गाळ्यांची एकूण थकबाकी 1,59, 399 इतकी आहे. थकबाकी भरण्याबाबत नोटिसा देऊनही सदर गाळ्यांची थकबाकी भरली जात नव्हती. त्यामुळे उपआयुक्त पंडित पाटील व सहा आयुक्त ,कर निर्धारक व संकलक नितीनकाका शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर दुकान गाळे सिलची कारवाई करण्यात आली.

वार्ड अधिकारी निखिल चोपडे, भाग क्लार्क अनिकेत क्षीरसागर, कोतवाल सचिन पाटील  यांनी सहभाग घेतला. अशाच पद्धतीने ज्या मालमत्ता धारकांनी आपली थकीत घरपट्टी भरली नाही अशा मालमत्तांवर कारवाई केली जाईल . त्यामुळे थकबाकी दारानी आपली थकीत घरपट्टी भरून सहकार्य करावे आणि आपल्या मालमत्तेवर संभाव्य होणारी कारवाई टाळावी असे आवाहन करण्यात आले आहे, 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.