Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली महापालिका उपायुक्तपदी पंडित पाटील यांची नियुक्ती

सांगली महापालिका उपायुक्तपदी पंडित पाटील यांची नियुक्ती


सागंली : लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांची बदली सांगली-मिरज व कुपवाड महापालिकेच्या उपायुक्तपदी झाली. यापूर्वी त्यांनी जत नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी म्हणून कामकाज केलेले आहे. पुढील आठवड्यात ते महापालिका उपायुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. 

सांगली महापालिकेतील उपायुक्तपद अनेक दिवसांपासून रिक्त आहे. त्यामुळे काही अधिका-यांना उपायुक्तपदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. या रिक्त जागेवर पंडित पाटील यांची पदोन्नतीने महापालिका उपायुक्तपदी बदली झाली. 

पंडित पाटील यांचे मूळगाव आरग (ता. मिरज) आहे. २०१० साली पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून निवड झाली. त्यानंतर पहिली नियुक्ती माझलगाव (जि. बीड) येथील नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून झाली. त्यानंतर सांगलीतील जत, साता-यातील म्हसवड व कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगर परिषदेत त्यांनी मुख्याधिकारी म्हणून कामकाज केले. 

सध्या लोणावळा नगर परिषदेत ते मुख्याधिकारी व प्रशासक म्हणून कार्यरत होते. या काळात लोणावळा नगर परिषदेला स्वच्छ शहर म्हणून देशात नामांकन मिळाले. पुढील आठवड्यात सांगली-मिरज व कुपवाड महापालिकेत ते उपायुक्त पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.