Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्ह्यातील ६४ गावांतील पाणी दूषित

सांगली जिल्ह्यातील ६४ गावांतील पाणी दूषित


सांगली जिल्ह्यातील ६४ गावांमधील ६७ ठिकाणचे पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. ज्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात दूषित पाणी आढळले आहे, त्यांना दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत. त्यानंतर पुन्हा पाणी नमुने दूषित आल्यास ग्रामसेवक व ग्रामपंयातीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

ग्रामीण भागात साथीच्या आजारांचा प्रसार थांबवून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेकडून पाण्याचे नमुने तपाले जातात. गेल्या महिन्यात जिल्ह्यातील विविध गावांतील १ हजार १८५ पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी ६४ गावांतील पाण्याचे नमुने दूषित असल्याचे आढळून आले. या सर्व गावांतील ग्रामसेवकांना दूषित पाण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. यापूर्वी दूषित पाणी आढळून आलेल्या गावांतील पाण्याचे नमुने पुन्हा दूषित आढळून आले आहेत. त्यामुळे संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.

तालुका व दूषित पाण्याची गावे

आटपाडी : करगणी, दिघंची, वाक्षेवाडी, य.पा.वाडी, पडळकरवाडी, नेलकरंजी, बोंबेवाडी.

जत : शेड्याळ, तिप्पेहळ्ळी, अचकनहळ्ळी, बेवनूर, वाळेखिंड, सोनलगी.

मिरज : इनामधामणी, नरवाड, दुधगाव, सांबरवाडी, ढवळी, कळंबी, कानडवाडी, भोसे, पद्माळे.

तासगाव : गव्हाण, बलगवडे, मांजर्डे, येळावी, गौरगाव, जुळेवाडी.

पलूस : पुणदीवाडी, धनगाव, दुधोंडी, संतगाव.
वाळवा : बेरडमाची इटकरे, मसुचीवाडी, फार्णेवाडी, साखराळे, कणेगाव, मालेवाडी, दुधारी, ताकारी, चिकुर्डे, पडवळवाडी, कामेरी, करंजवडे, जुनेखेड.

शिराळा : धसवाडी, खुजगाव, बेलेवाडी, रिळे, बोंबेवाडी, शिवरवाडी, खेड, निगडी.

खानापूर : कमळापूर, कळंबी.

कडेगाव : खेराडे विटा, कोतीज, कुंभारगाव, रामापूर, सोनसळ, देवराष्ट्रे, वांगी, अंबक, चिंचणी.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.