Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या कपड्यावरती शेण टाकणाऱ्यां लोकांचे ना.भुजबळाने शेण खाऊ नये.; राज्य प्रवक्ते संतोष पाटील.

क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या कपड्यावरती शेण टाकणाऱ्यां लोकांचे ना.भुजबळाने शेण खाऊ नये.; राज्य प्रवक्ते संतोष पाटील.


महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या थोर दापत्याने गोरगरीब रंजलेल्या,दबलेल्या,पिचलेल्यां, लोकांची मुले  शिक्षणापासून वंचित राहू नये त्यांना लिहिता वाचता यावे व त्यांनी साक्षर बनावे,म्हणून त्यांना शिक्षण देण्यासाठी शाळा सुरू केल्या व त्या ठिकाणी सर्व समाजातील गोरगरीब,वंचित, व सर्व जाती धर्मातील,बहुजन समाजातील मुलांना शिक्षण घेता यावे  क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या कपड्यावरती शेण टाकणाऱ्यां लोकांचे ना.भुजबळाने शेण खाऊ नये.; राज्य प्रवक्ते संतोष पाटील.


यासाठी शाळेमध्ये स्वतः शिकवत होत्या व त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यां उपस्थित होते,परंतु काही विशिष्ट समाजातील लोकांना ही मुले शिक्षण घेऊन आमच्या पुढे जातील अशी भीती मनात निर्माण होऊन त्यांची शाळा बंद पाडण्याची प्रयत्न केले, तरीसुद्धा महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी वंचित घटकातील मुलांना शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावरती उभे करून त्यांना शिक्षण देण्याचे काम चालूच ठेवले, परंतु काही वेळेला घरातून शाळेत जात असताना त्यांच्या अंगावरती ज्यां मुलाने शिक्षण घेऊ नये असे वाटणाऱ्या लोकांनी त्यांना त्रास देऊन,त्यांच्या रस्ता अडवून, धमकी देऊन त्यांच्या अंगावरती शेण फेकून मारत होते ही वस्तुस्थिती पूर्ण जगभरात आपल्या देशात सर्वांना माहीत आहे.

हे जोपर्यंत या पृथ्वीतलावर चंद्र तारे सूर्य असेपर्यंत कोणीही विसरू शकणार नाही हे  महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वारस स्वतःला समजणारे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आपलं कॅबिनेट  मंत्रीपद राहावं म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या सांगण्यावरून ओबीसी समाज व मराठा समाज यांच्यात फूट पाडून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम ना.छगन भुजबळ हे करीत आहेत,त्यांनी भूतकाळात केलेल्या भ्रष्टाचार बाहेर काढू नये व जर काढल्यास मला जेलमध्ये टाकतील या भीतीपोटी जालना येथे झालेल्या ओबीसी मेळाव्यामध्ये मराठा समाजाचे आरक्षणाचे जनक सन्माननीय मनोज जरंगे पाटील व मराठा समाजावर खालच्या भाषेत टीका केली. 

त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर अन्याया झालेल्याचा विशिष्ट लोकांनी त्रास दिल्याचा त्यांच्या बोलण्यातून दिसून येत नव्हता यावरून ना. छगन भुजबळ यांना मागील काही घडलेल्या घटनाचा विसर पडलेला दिसतआहे,यांचा अपमान होईल असे वागले आहेत  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत जाण्याच्या वेळेला त्यांच्या कपड्यावरती शेण टाकणाऱ्या लोकांचे ना. छगन भुजबळ यांनी शेन खाऊ नये अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी पत्रकार बैठकीमध्ये माहिती दिले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.