आता तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये 'या' पेक्षा जास्त ठेऊ नका पैसे, अन्यथा भरावा लागेल टॅक्स, आयकर विभागाने जारी केले नियम
प्रत्येकाचेच कोणत्या ना कोणत्या बँकेत बचत खाते असतेच. कारण सर्वच लोक या अकाऊंट्सचा वापर पैशांच्या व्यवहाराकरिता करतात. आजच्या टेक्निकल युगात तुम्ही तुमच्या बचत खात्यास यूपीआय जोडून ऑनलाइन पैशांचा व्यवहार करू शकता. बचत खात्याच्या नावावरूनच लक्षात येते की हे खाते बचत करण्यासाठीच उघडले जाते.
Saving Account Limit
तुम्हाला बचत खात्यात किती पैसे ठेवता येतील आणि जास्त पैसे ठेवल्यास किती कर भरावा लागेल, याची माहिती अनेकांना नसते. देशातील प्रत्येक नागरिकाला याची माहिती असायला हवी. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बचत खात्यात किती पैसे ठेवल्यानंतर कर भरावा लागेल हे सांगणार आहोत.
बचत खात्यात किती पैसे ठेवता येतात?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, बचत खात्यात पैसे ठेवण्याची कोणतीही मर्यादा नाही. आपण आपल्या बचत खात्यात हवे तितके पैसे ठेवू शकता, परंतु जेव्हा मर्यादा ओलांडली जाईल तेव्हा आपल्याला कर भरावा लागेल. तुम्ही तुमच्या बचत खात्यात जितके जास्त पैसे ठेवाल, तेवढं जास्त व्याज बँक तुम्हाला देईल.
ITR भरताना द्यावी लागणार माहिती
आयटीआर भरताना तुमच्या बचत खात्यात किती पैसे जमा झाले आहेत, हेही आयकर विभागाला सांगावे लागेल. याशिवाय त्यावर किती पैसे मिळतात हेही सांगावे लागते. जर तुमच्या बचत खात्यात जास्त पैसे असतील आणि त्यावर तुम्हाला व्याज मिळत असेल तर ते तुमच्या उत्पन्नात गणले समजा एका वर्षात तुमचे उत्पन्न 20 लाख रुपये आहे, ज्यावर बँकेने तुम्हाला 1 लाख रुपयांचे व्याज दिले आहे, तर इन्कम टॅक्सच्या नियमांनुसार तुमचे एकूण उत्पन्न 21,00,000 रुपये होईल.
बचत खात्यात जास्त पैसे ठेवल्यास काय होईल?
कोणत्याही बँकेच्या बचत खात्यात पैसे ठेवण्याची मर्यादा नाही. पण जर तुम्ही एका आर्थिक वर्षात तुमच्या बचत खात्यात 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा केली असेल तर तुम्हाला त्याची माहिती आयकर विभागाला द्यावी लागेल. एवढा पैसा ठेवल्यानंतर तो कराच्या कक्षेत येतो. तसे न करणाऱ्यांवर आणि करचुकवेगिरीच्या प्रकरणात अडकलेल्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.