Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उद्योगपती सुब्रत रॉय यांचे दीर्घ आजाराने निधन; मुंबईत उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

उद्योगपती सुब्रत रॉय यांचे दीर्घ आजाराने निधन; मुंबईत उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास


सहारा इंडिया समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे मंगळवारी निधन झाले. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 75 वर्षांचे होते. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. सहारा कुटुंबाचे प्रमुख सुब्रत रॉय दीर्घकाळापासून गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी त्यांचे पार्थिव लखनौमधील सहारा शहरात आणले जाईल, जिथे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल.

सुब्रत रॉय सहारा यांचा जन्म 10 जून 1948 रोजी झाला. ते भारतातील आघाडीचे व्यापारी आणि सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक होते. त्यांना देशभरात 'सहरश्री' म्हणूनही ओळखले जात होते. समाजवादी पक्षाने त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून श्री सुब्रत रॉय यांच्या निधनाने दु:ख झाल्याचे म्हटले आहे. अतिशय दु: खी. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो. भावपूर्ण श्रद्धांजली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.