Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुख्यमंत्र्यांचे सरकारी वर्षा निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ झाले आहे का?

मुख्यमंत्र्यांचे सरकारी वर्षा निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ झाले आहे का?


मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान 'वर्षा' बंगल्यावर सर्वसामान्यांना प्रवेश मिळणे मुश्कील असते. 'वर्षा'वर प्रवेश देताना विविध पातळ्यांवर सुरक्षेची तपासणी केली जाते; परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात 'वर्षा'वर गुंडांना सहज प्रवेश मिळतो.

सापांच्या विषाच्या रेव्ह पार्ट्या आयोजित करणाऱ्या एल्वीस यादव या युट्युबरला विशेष आमंत्रण देऊन वर्षावरील गणपती आरतीला बोलावल्याचे उघड झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

विषारी रेव्ह पार्टी आयोजित केल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी एल्वीस यादव व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांच्याकडे जिवंत विषारी साप सापडले आहेत. नोएडा पोलिसांना एल्वीस रेव्ह पार्ट्या आयोजित करतो याचा छडा लागला; पण मुंबई अथवा महाराष्ट्र पोलिसांना एल्वीसच्या काळ्या कृत्यांची माहिती नव्हते असे म्हणता येईल का,एल्वीसची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची असताना त्याची माहिती पोलिसांनी नसावी व मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवास्थानी त्याला पाहुणा म्हणून विशेष सन्मान दिला जातो, हे आश्चर्यकारक आहे.


एल्वीस यादवला 'वर्षा'वर कोणाच्या सांगण्यावरून विशेष सन्मान मिळाला, हे महाराष्ट्राला समजले पाहिजे, असे लोंढे यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुण्यातील कुख्यात गुंड बाबा बोडकेचे वर्षा बंगल्यावरील फोटो झळकले होते. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरच गुंडांना विशेष पाहुणा म्हणून मान सन्मान मिळत असेल तर पोलिस विभाग तर काय करणार, हे अत्यंत गंभीर असून या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांचा शासकीय वर्षा बंगलाच जर गुंडांना 'अतिथि देवो भव' म्हणत असेल तर कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असाच प्रश्न पडतो असेही लोंढे म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.