Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकाऱ्यांचे मागण्या व प्रश्न मार्गी लावू. आमदार सुधीरदादा गाडगीळ

राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकाऱ्यांचे मागण्या व प्रश्न मार्गी लावू. आमदार सुधीरदादा गाडगीळ

सांगली 28 नोव्हेंबर 24 :- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पदावर कार्य कर्मचारी व अधिकारी यांना नियमित सेवेत समायोजन पूर्ण होईपर्यंत समान काम समान वेतन व इतर मागण्या मंजूर होण्याबाबत 25 ऑक्टोंबर पासून महाराष्ट्र काम बंद आंदोलन सुरू आहे. याबाबत आज आमदार जनसंपर्क कार्यालयामध्ये भेट घेऊन त्यांच्या मागण्याचे निवेदन संबंधित आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी दिले व त्याबाबत माहिती दिली या सर्व मागण्याबाबत नागपूर  येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्री यांच्याशी भेटून त्या मागण्या पूर्ण करण्याकरता येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न विचारून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेन तसेच त्यांचा  मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी दिले.


यावेळी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे संचालक पी एन काळे, दिलीप कुमार शिंदे, अरुण पाटील, शितल नांगरे, नीता ऐवळे, विजया केसरे, शरद कुंभार, रूपाली पाटील निर्मला कांबळे वंदना शिंदे, चित्रा कुलकर्णी, कबीर डोरले, संकेत पाठक, गौरव माळी आदी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.