Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जत येथील उटगीजवळ भीषण अपघात; एक जण ठार, एक गंभीर जखमी

जत येथील उटगीजवळ भीषण अपघात; एक जण ठार, एक गंभीर जखमी


जत: उमदी रस्त्यावर उटगी पुलाच्या ठिकाणी वळणावर अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने मोटारसायकलवरील एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता घडली. जखमीला जत येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जत - उमदी रस्त्यावरील उटगी पुलाच्या जवळ वळणावर जत कडून मोटरसायकल कमांक एम एच १० CE 7193 उमदीकडे येत होते. येथील वळणाच्या ठिकाणी समोरून येणारे मोठे वाहन दिसले नाही.या वाहणाची धडक बसल्यानेच अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या भिषण आपघातात मोटरसायकल वरील शरद भोसले वय 26 राहणार कारंडेवाडी (निगडी बुद्रुक) याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर उमदीचे माजी उपसरपंच चंद्रकांत नागणे हे गंभीर जखमी आहेत. जखमीला उपचारासाठी जत येथे दाखल करण्यात आले आहे. या अपघाताच्या घटनेनंतर घटनास्थळी बघायची एकच गर्दी झालेली पाहायला मिळाली. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. धडक दिलेले वाहन घटनास्थळावरून प्रसार झाले आहे.

खड्ड्याने घेतला जीव

जत -उमदी रस्त्यावर वळण व मोठमोठे खड्डे असल्याने मोटरसायकल स्वरांना खड्ड्यातून मार्क काढता- काढता वळणावर आपला जीव गमवावा लागत आहे. आजही मोठा खड्डा होता खड्डा चुकवण्याच्या नादात समोरचे वाहन धडकल्याने मोटरसायकल वरील एकाला आपला जीव गमवावा लागला तर दुसरा गंभीर जखमी आहे. वळण आणि खड्ड्यामुळे निष्पापांचे बळी जात आहेत त्यामुळे रस्त्यावरील वळण आणि खड्डे याला संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.