ईडीची नोटीस आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले.
दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणचा तपास आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचला आहे. ईडीने केजरीवाल यांना आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालय ते ईडी कार्यालयापर्यंत सुरक्षा व्यवस्था कडेकोट आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, ईडीच्या नोटीसीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ईडीची नोटीस बेकायदेशीर आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. ईडीने भाजपच्या इशाऱ्यावर नोटीस पाठवली असून, मला ४ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत प्रचार करता न यावा यासाठी भाजपने रचलेलं हे षडयंत्र आहे, असा आरोपही अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. त्याचबरोबर ईडीने ही नोटीस तातडीने मागे घ्यावी, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांना ईडीची नोटीस आल्यानंतर 'आप'चे नेते आक्रमक झाले आहेत. भाजप जाणून बुजून आम आदमी पक्षाला संपवण्याचा प्रयत्न करीत आहे. अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप 'आप'च्या नेत्यांकडून केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.