Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'सरकार सर्वच ठिकाणी भगवाकरण करते..'टीम इंडियाच्या प्रॅक्टिस जर्सीच्या रंगावरून ममता बॅनर्जी संतापल्या

'सरकार सर्वच ठिकाणी भगवाकरण करते..'टीम इंडियाच्या प्रॅक्टिस जर्सीच्या रंगावरून ममता बॅनर्जी संतापल्या

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टीम इंडियाच्या जर्सीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'सर्व काही भगव्या रंगात रंगवले जात आहे' ममता यांचा थेट निशाणा भाजपवर होता. सीएम ममतांच्या या वक्तव्यावर भाजपने प्रत्युत्तर देत म्हटले की, ‘ममतांनी संपूर्ण कोलकाता निळ्या-पांढऱ्या रंगात रंगवला आहे.’ असं म्हणत भाजपने प्रतिउत्तर दिल आहे.

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, ‘आता सर्व काही भगवे होत आहे! आम्हाला आमच्या भारतीय खेळाडूंचा अभिमान आहे आणि मला विश्वास आहे की ते जगज्जेते होतील… पण जेव्हा ते सराव करतात तेव्हा त्यांचा पेहरावही भगवा झालाय…! पूर्वी ते निळ्या रंगाचे कपडे घालायचे. मेट्रो स्थानकांनाही भगवा रंग दिला जात आहे. मायावतींनी स्वतःचा पुतळा बनवला होता हे मी ऐकले होते, पण आता ते सामान्य झाले आहे… आता प्रत्येक गोष्टीला नमोचे नाव दिले जात आहे. हे नाकारता येणार नाही.’


ममता बॅनर्जी यांनी कोणाचेही नाव न घेता या कृत्याचा निषेध केला. त्या पुढे म्हणाले, ‘त्यांचे पुतळे उभारण्यास माझा आक्षेप नाही, पण ते सर्व काही भगव्या रंगात रंगवण्याचा प्रयत्न करत आहेत. मायावतींनी स्वतःचा पुतळा बांधल्याचे मी पाहिले होते. त्यानंतर, मी असे काहीही ऐकले नाही. अशा प्रकारची नौटंकी नेहमीच नफा मिळवू शकत नाही. सत्ता येते आणि जाते. भाजपवर टीका करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘हा देश जनतेचा आहे, फक्त एका पक्षाचा नाही.’

राज्याचा पैसा रोखल्याबद्दल केंद्रावर निशाणा साधत बॅनर्जी म्हणाले की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार पहिल्या पानावरील जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यास तयार आहे, परंतु त्यांनी राज्याचे देय पैसे रोखले आहेत, ज्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. (मनरेगा) कामगारांना वंचित ठेवण्यात आले आहे.’ असेही त्या म्हणाल्या आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.