Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबईतील BARC क्वॉर्टरमध्ये १९ वर्षीय तरुणीला नशेचे औषध पाजून सामूहिक बलात्कार

मुंबईतील BARC क्वॉर्टरमध्ये १९ वर्षीय तरुणीला नशेचे औषध पाजून सामूहिक बलात्कार


मुंबईतील चेंबूर परिसरात भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर (BARC) क्वार्टरमधील एका फ्लॅटमध्ये १९ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराचा प्रकार समोर आला आहे. चेंबूर पोलिसांनी मुलीच्या जबाबावरून दोन आरोपींना अटक केली आहे. पकडलेल्या दोन आरोपींपैकी एक पीडितेचा शेजारी आहे. घटनेच्या दिवशी तरुणी घरातील काही सामान आणण्यासाठी गेली होती. तरुणाने तिला नशेचे औषध घातलेले कोल्डड्रिंक पाजले. त्यानंतर तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर आपल्या मित्राला बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. 

शुद्धीवर आल्यानंतर तरुणीने पोलिसात तक्रार केली. आरोपींविरुद्द IPC कलम ३७६, ३७६ (डी), ३२८ आणि ३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांना दोघांना अटक करून न्यायालयात सादर केले असता दोघांना २० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजित कुमार यादव (२६) आणि प्रभाकर यादव (३०) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील अजितचे वडील भाभा एटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये कार्यरत आहेत. त्यांना कँपसमध्ये क्वार्टर मिळाले आहे. अजीतने षडयंत्र रचत आपल्या कुटूबीयांच्या अनुपस्थितीत आपला मित्र प्रभाकरला घरी बोलावले. त्यानंतर पीडितेलाही घरी बोलावले. पीडिता रात्रीचे जेवण करत होती, मात्र मित्राने बोलावल्यावर ती त्याच्या घरी गेली. तेथे गेल्यानंतर तिला कोल्ड ड्रिंक ऑफर केले गेले. दोघांच्या हेतूविषयी अनभिज्ञ असलेल्या पीडितेने ते ड्रिंक प्यायले. त्यानंतर ती तत्काळ बेशुद्ध झाली.

पीडिता बेशुद्ध झाल्यानंतर दोन्ही नराधमांनी आळीपाळीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिला शुद्ध येईपर्यंत दोघेजण तिच्यावर बलात्कार करत राहिले. शुद्धीवर आल्यानंतर तरुणीला समजले की, आपल्यासोबत काय झाले आहे. तिने पळतच घर गाठले व तेथून पोलीस ठाणे. पोलिसांनी सांगितले की, ही घटना १५ व १६ नोव्हेंबर च्या दरम्यान रात्री घडली. पीडिता आपल्या आई व बहिणीसोबत पालघर जिल्ह्यातील भोईंसरमध्ये रहाते. मात्र घटनेच्या दिवशी ती आपल्या वडिलांना भेटायला आली होती. मुख्य आरोपी अजितने इंडक्शन घेऊन येण्यास सांगितले होते. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडिता व आरोपी दोघांचे वडील भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर मध्ये नोकरीला आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.