Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सोनिया-राहुल गांधींना ईडीचा झटका! संबंधित कंपनीची 751 कोटींची संपत्ती जप्त


सोनिया-राहुल गांधींना ईडीचा झटका! 
संबंधित कंपनीची 751 कोटींची संपत्ती जप्त

नवी दिल्ली : 

सक्तवसुली संचलनालयाने (ED) नॅशनल हेराल्ड प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. ईडीने काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी संबंधित यंग इंडियन कंपनीची 90 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये दिल्ली आणि मुंबईतील नॅशनल हेराल्ड हाऊस आणि लखनऊमधील नेहरू भवन यांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, असोसिएटेड जर्नल्सच्या जप्त केलेल्या मालमत्तांची एकूण किंमत 752 कोटी आहे.

नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित प्रकरणी ईडी कथित मनी लाँड्रिंगचा तपास करत आहे. याप्रकरणी ईडी आधीपासूनच याप्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडद्वारे वृत्तपत्र चालवणाऱ्या असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या अधिग्रहणात फसवणूक, कट रचणे आणि विश्वासार्हतेचं उल्लंघन केल्याच्या आरोपांचा समावेश आहे.

केंद्रीय तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, दिल्ली आणि लखनऊतील असोसिएट जर्नल्स लिमिटेडच्या संपत्तीची किंमत 667.9 कोटी आहे. तसंच यंग इंडियाच्या मालमत्तेची किंमत 90.21 कोटी असल्याची माहिती ईडीने दिली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.