Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'7/12 आमच्या बापाचा, बांधावर येऊ नका', भुजबळांना स्वत:च्या मतदारसंघातील दौऱ्याला मराठा समाजाचा विरोध, ऑडिओ क्लिप व्हायरल

'7/12 आमच्या बापाचा, बांधावर येऊ नका', भुजबळांना स्वत:च्या मतदारसंघातील दौऱ्याला मराठा समाजाचा विरोध, ऑडिओ क्लिप व्हायरल


राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. मंत्री छगन भुजबळ आज नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. मात्र, त्यांच्या दौऱ्याला येवला मतदारसंघातून मोठी विरोध पहायला मिळत आहे. छगन भुजबळ यांच्या या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या दौऱ्याला विरोध करणारे एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे. 

'आम्ही नुकसान सोसू पण तुम्ही बांधावर येऊ नका', असं गावकऱ्यांनी म्हटलं आहे. शासन दरबारी भांडून आम्हाला निधी उपलब्ध करुन द्या, मात्र, आमच्या बांधावर येण्याचा अट्टाहास का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. यासह सोमठानदेश गावात भुजबळ गो बॅकच्या घोषणाही देण्यात आल्या आहेत. भुजबळ यांच्या दौऱ्याला विरोध करणारे व्हिडीओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसत आहेत. छगन भुजबळ यांना त्यांच्याच येवला मतदारसंघातुन विरोध होताना दिसत आहे. छगन भुजबळ गारपीटग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. दौऱ्याला विरोध करणारी एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये 'मला कोणी गावबंदी करू शकत नाही, मी कुणाला घाबरत नाही' असं भुजबळ म्हणाले आहेत.

काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये ?

ग्रामस्थ: सोमठाणे देश मधून बोलत आहे, तिथे तुमचा दौरा आहे, सकल मराठा समाजाच्यावतीने भुजबळ साहेब तुम्हाला हात जोडून विनंती करतो येऊ नका, आमच्या गावच्या बांधावर येऊ नका....
छगन भुजबळ: ठिक आहे, बघू काय करायचे ते? 

ग्रामस्थ : तुम्ही आले तर वातावरण खराब होऊन जाईल. सर्व गावकऱ्यांची विनंती आहे तुम्ही येऊ नये.

छगन भुजबळ: बरं.बरं...

ग्रामस्थ : जमीनीचा 7/12 आमच्या बापाचा आहे. तुम्हाला व्हिडीओ पाठवला आहे तो बघून घ्या, हात जोडून विनंती आहे येऊ नका.

छगन भुजबळ: असं आहे, मला कोणी म्हटलं या तर मी जाईल, नाही म्हटलं तर बघू...

ग्रामस्थ : आमच्या गावचा ठराव झाला आहे. कोणालाही गावात येऊ द्यायचे नाही त्यामुळे तुम्ही येऊ नका.. 

छगन भुजबळ: तुम्ही चार लोक म्हणजे ठराव होतो का?

मंत्री छगन भुजबळ आज येवला आणि निफाड तालुक्यातील अवकाळीच्या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर असणार आहेत. सकाळी ९ वाजता येवल्यातून करणार पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. तर भुजबळांच्या नुकसान पाहणी दौऱ्याला सकल मराठा समाजाचा मात्र विरोध दिसून येत आहे.

रात्रीपासूनच येवला तालुक्यातील काही गावात भुजबळांना विरोध करण्यासाठी मराठा बांधव रस्त्यावर उतरले आहेत. मराठा बांधवांच्या विरोधामुळे येवल्यातील भुजबळांच्या संपर्क कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. संपर्क कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भुजबळांचा आजचा नुकसान पाहणी दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.