Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

57 वर्षाच्या व्यक्तीला 80 वर्षीय महिलेवर झालं प्रेम, हटके लव्ह-स्टोरी

57 वर्षाच्या व्यक्तीला 80 वर्षीय महिलेवर झालं प्रेम, हटके लव्ह-स्टोरी


नवी दिल्ली : प्रेम कधी कोणावर होईल काही सांगता येत नाही. प्रेमात लोक आंधळे होतात म्हटलं जातं, तर प्रेमात कसलंही बंधन नसतं. लोक प्रेमात जात, वय, रंग सर्व बंधने झटकून देऊन आकंठ बुडालेले दिसतात.


प्रेमाची अनेक वेगवेगळी उदाहरणे पहायला मिळतात. अनेक घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतात. अशातच अशीच एक घटना चर्चेत आली आहे ज्यामध्ये वयाचं बंधन झुकारुन एकमेकांच्या प्रेमात पडले. एका 57 वर्षाच्या व्यक्तीला 23 वर्षांनी मोठ्या महिलेवर प्रेम झालं. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.

एक अनोख्या लग्नाची घटना चर्चेत आलंय. 57 वर्षाच्या पुरुषाला 23 वर्षांनी मोठ्या महिलेवर प्रेम झालं. दोघांनी लग्नही केलं. डेव्हिड फाऊट असं या पुरुषाचं नाव आहे , तर महिलेचे नाव कॅरोलिन हॉलंड आहे. महिलेचं वय 80 आहे.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या 57 वर्षीय डेव्हिडकडे स्वतःचे कोणतेही घर नाही. तो कसा तरी आयुष्य काढत होता. त्याच्याकडे कायमस्वरूपी नोकरीही नव्हती, उलट तो इतरांच्या घरात खराब झालेल्या वस्तू दुरुस्त करण्याचx काम करत असे. दरम्यान, डेव्हिड 80 वर्षीय कॅरोलिनला भेटला आणि ते प्रेमात पडले. काही आठवड्यांतच त्यांचे प्रेम इतके फुलले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

रिपोर्टनुसार, कॅरोलिन खूप श्रीमंत महिला होती. तिला दोन मुली देखील आहेत, ज्यांनी डेव्हिडवर त्यांच्या आईला फसवल्याचा आणि पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप केला आहे. कॅरोलिनच्या दोन मुलींनी दावा केला की त्यांच्या आईने तिची 5 कोटी रुपयांची संपत्ती विकून संपूर्ण पैसे डेव्हिडला दिले होते, परंतु त्याच दरम्यान कॅरोलिनची प्रकृती खालावली आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या दोन्ही मुलींना त्यांच्या संपत्तीवर हक्क मिळाला. अशा परिस्थितीत त्यांनी डेव्हिडच्या एक पैसाही देण्यास नकार दिला. आता असं सांगण्यात येत आहे की डेव्हिड पुन्हा बेघर झाला आहे आणि आपले जुने आयुष्य जगत आहे. हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.