जेट एअरवेजचे गोयल यांची 538 कोटींची मालमत्ता जप्त
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि त्यांचे कुटुंबीय व कंपन्यांच्या मालकीची लंडन, दुबई आणि हिंदुस्थानातील 538 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. 17 निवासी फ्लॅट, बंगले आणि व्यावसायिक जागांचा ईडीने टांच आणलेल्या मालमत्तांमध्ये समावेश आहे. एका कथित बँक लोन गैरव्यवहारप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीचा भाग म्हणून ईडीने ही कारवाई केली आहे. मंगळवारी ईडीने त्यांच्यावर पीएमएलए विशेष कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.