Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी छत्तीसडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच नाव आलं समोर, 508 कोटी घेतले?

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी छत्तीसडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच नाव आलं समोर, 508 कोटी घेतले?

मुंबई: महादेव बेटींग अॅप प्रकरणी सिनेसृष्ट्रीतील अनेक कलाकारांचा नाव समोर आलं. यामध्ये रणबीर कपूर ते श्रद्धा कपूरला ईडीनं समन्स पाठवलं होतं. आता या प्रकणी राजकीय नेत्याचंही नाव समोर आलं अहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच नाव सध्या चर्चेत आहे. भूपेश बघेल यांना महादेव अॅप प्रमोटर्सने आतापर्यंत सुमारे 508 कोटी रुपये दिले असा दावा ईडीने केला आहे. या प्रकरणी ईडीनं नुकतीच असीम दासला नावाच्या व्यक्तीला अटक त्याने बघेल यांना मोठी रक्कम दिल्याचा दावा केला आहे. या दाव्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

मुंंख्यमंत्री भूपेश बघेल यांना दिले पैसै?

ईडीनं मिळालेल्या माहितीनुसार, आगमी काळात छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महादेव बेटिंग ॲप प्रवर्तकांकडून छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड पाठवण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे ईडीने तपास केला असता त्यांनी असीम दास नावाच्या व्यक्तीला पकडले. असीम दासची चौकशी केली असता, त्याच्या कारमधून आणि त्याच्या निवासस्थानातून ईडीने 5.39 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली. जप्त केलेला निधी महादेव अँप प्रवर्तकाने छत्तीसगड राज्यातील आगामी निवडणुकीच्या खर्चासाठी एका राजकारणी 'बघेल' याला देण्याची व्यवस्था केली असल्याची कबुली असीम दास याने दिल्याचं ईडीने म्हटलं आहे.


भूपेश बघेल यांचं स्पष्टीकरण

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ईडीचे आरोप फेटाळले आहेत. पराभव समोर दिसू लागल्यानंतर आता भाजपने आपली बदनामी सुरू केली असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, "भारतीय जनता पक्षाला ईडी, आयटी, डीआरआय आणि सीबीआय यांसारख्या एजन्सींच्या मदतीने छत्तीसगडची निवडणूक लढवायची आहे. निवडणुकीपूर्वी ईडीने माझी प्रतिमा डागाळण्याचा अत्यंत दुर्भावनापूर्ण प्रयत्न केला आहे."

यापुर्वी भूपेश बघेल यांनी भाजपवर केले होते आरोप

यापुर्वी भूपेश बघेल यांनी भाजपवर आरोप केले होते. केंद्र सरकारने निवडणूक निधी घेतला असावा. त्यामुळेच ते ऍप बंद करत नाही, असा आरोप त्यांनी केंद्रावर केला होता. तसेच भाजपच्या आरोपांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. भाजपने आरोप केला होता की, काँग्रेस महादेव ऍपच्या माध्यमातून दाऊद आणि पाकिस्तानकडून पैसे मिळवत आहे. बघेल यांनी भाजपाच्या आरोपांना पलटवार करत महादेव अॅप बंद करणे हे केंद्र सरकारचे काम आहे, राज्य सरकारचे नाही, असे सांगितले.

केंद्र सरकारवर आरोप करत त्यांनी सरकार महादेव ऍप का बंद करत नाही, असा सवाल केला. त्यांनी त्यांच्याकडून निवडणूक निधी घेतला आहे का?, असा प्रश्नही उपस्थित केला. महादेव ऍप संपूर्ण देशात सुरू आहे. त्यात केवळ भाजपाचेच लोक सहभागी आहेत, असा आरोपही त्यांनी केला. बघेल पुढे म्हणाले, केंद्र सरकार बेटिंग ऍपवर जीएसटी लावून पैसे वसूल करत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.