Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

46 लाख रुपयांची आहे 'ही' तीन वर्षांची म्हैस; नक्की असं काय खाते आणि किती दूध देत, वाचा

46 लाख रुपयांची आहे 'ही' तीन वर्षांची म्हैस; नक्की असं काय खाते आणि किती दूध देत, वाचा 


मुंबई : हरियाणा राज्य हे पशुपालनासाठी प्रसिद्ध आहे. तिथल्या भिवानी भागातल्या एका म्हशीची सध्या खूप चर्चा आहे. त्या म्हशीचं नाव धर्मा असं आहे आणि त्या म्हशीच्या मालकाने तिची किंमत एवढी ठेवली आहे, की ती टोयोटा फॉर्च्युनर या आलिशान गाडीपेक्षाही महाग आहे.

त्या म्हशीविषयी जाणून घेऊ या.

ज्याच्या घरी म्हशी आहेत, त्याच्या घरी दिवाळी अशा आशयाची एक म्हण हरियाणात प्रसिद्ध आहे. कारण राज्यातले शेतकरी उत्तम गुणवत्ता असलेल्या म्हशींचं चांगलं संगोपन करतात. साहजिकच त्यापासून त्यांना चांगली कमाई मिळते. या म्हशींच्या किमती फॉर्च्युनर कारपेक्षाही महाग आहेत, हे ऐकून धक्काच बसेल.

भिवानीमधल्या जुई गावात राहणाऱ्या संजय नावाच्या शेतकऱ्याकडे धर्मा नावाची ही म्हैस आहे. तिचं वय अवघं तीन वर्षं आहे. त्या शेतकऱ्याने म्हशीला अगदी आपल्या पोटच्या मुलासारखं जपलं, वाढवलं आहे. पहिल्या रेडकाला जन्म दिल्यानंतर ही म्हैस एका वेळी 15 लिटर दूध देते.

हरियाणात सध्या फॉर्च्युनर आणि थार यांच्यासारख्या गाड्या लोकप्रिय आहेत. लाखो रुपये खर्च करून या गाड्या घेण्यात अनेक जण धन्यता मानतात. संजय यांच्या म्हशीची किंमत त्यापेक्षाही जास्त आहे. धर्माची जी किंमत ठरवली गेली आहे, त्यात केवळ फॉर्च्युनरच नव्हे, तर थारही खरेदी करता येऊ शकेल. संजय यांनी सांगितलं, की काही दिवसांपूर्वी धर्माची किंमत 46 लाख रुपये निश्चित करण्यात आली होती. आता मात्र ते कमीत कमी 61 लाख रुपयांना ती विकणार आहेत. म्हणजे त्यात किती फॉर्च्युनर आणि थार येतील याचा विचार करा.

संजय यांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्माला जन्मापासूनच थंडीच्य दिवसांत हिरवा चारा, चांगलं धान्य आणि दर दिवशी 40 किलो गाजरं खाऊ घातली जातात. तिची देखभाल पूर्ण दिवसभर करावी लागते. धर्मा दिसायलाही खूप सुंदर आहे, असंही संजय यांनी सांगितलं. त्यामुळे पंजाब आणि यूपीसह आसपासच्या जिल्ह्यांतही य म्हशीने अनेक सौंदर्यस्पर्धा जिंकल्या आहेत.

केवळ मालक संजयच नव्हे, तर पशुवैद्यक रितिक हेदेखील धर्माची प्रशंसा करतात. डॉ. रितिक यांनी सांगितलं, की सौंदर्याचा विचार केला, तर धर्मा ही म्हशींची राणीच म्हणायला हवी. ही म्हैस छोटी असली, तरी जणू हत्तीचं पिल्लू आहे. सौंदर्य आणि वाणाच्या बाबतीत विचार करायचा झाला, तर ही म्हैस कदाचित हरियाणातली सर्वांत चांगली म्हैस असावी. डॉ. रितिक सांगतात, की संजय यांची ही धर्मा म्हैस 61 लाख रुपये नव्हे, तर त्यापेक्षाही अधिक किमतीत विकली जाऊ शकेल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.