Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राजस्थानमधे भीषण अपघात, पुलाचं रेलिंग तोडून बस थेट पडली रेल्वे रुळावर, 4 जणांचा मृत्यू!

राजस्थानमधे भीषण अपघात, पुलाचं रेलिंग तोडून बस थेट पडली रेल्वे रुळावर, 4 जणांचा मृत्यू!

राजस्थानमधील दौसा येथे आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातली सर्व प्रवासी हे त्यांच्या नातेवाईकाच्या अस्थिविसर्जनासाठी हरिद्वारले गेले होते. परत येताना राष्ट्रीय महामार्ग-21 वर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ड्रायव्हरचं बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पुलावरील रेलिंग तोडून खाली थेट रेल्वे रुळावर पडली.

दौसा डीएम कमर चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 2.15 च्या सुमारास जयपूर दिल्ली रेल्वे मार्गावरीलराष्ट्रीय महामार्ग-21 वर हा भीषण रस्ता अपघात झाला. येथे हरिद्वारहून जयपूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी बसवरी ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले, लोखंडी रेलिंग तोडून कल्व्हर्टवरून खाली पडली. कल्व्हर्टवरून बस रेल्वे रुळावर पडल्याची माहिती मिळताच जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस व रुग्णवाहिका वाहने घटनास्थळी दाखल झाली.


कसा झाला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, हरिद्वारहून जयपूरच्या दिशेने जाणारी ही प्रवासी बस पहाटे २.१५ च्या सुमारास नियंत्रणाबाहेर गेली. भरधाव वेगात असलेली बस लोखंडी रेलिंग तोडून दुभाजकावरून थेट रुळावर पडली. अपघातानंतर बस महामार्गाच्या दोन लेनमधील जागेतून जात असताना खाली रुळावर जाऊन पलटी झाली.

चार जणांचा मृत्यू

घटनेनंतर कोतवाली, सदर, जीआरपी, आरपीएफसह अनेक पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृत व जखमींचे मृतदेह बसमधून बाहेर काढले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवण्यात आले. डॉक्टरांनी दोन महिलांसह एकूण चार जणांना मृत घोषित करण्यात आले. रुग्णालयात दाखल असलेल्या पाच रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जयपूरला रेफर करण्यात आले आहे. मदत आणि बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर आणि जखमींवर उपचार केल्यानंतर अपघाताचा तपास सुरू होईल, असे पोलिस-प्रशासनाचे म्हणणे आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.