रिलायन्स ज्वेलरी शोरुममध्ये 32 मिनीटांत तब्बल 20 कोटी रुपयांचे दागिने लंपास; व्हिडिओ पहा
अवघ्या 32 मिनीटांत चोरट्यांनी रिलायन्स शोरुमधून 20 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तराखंड राज्यातील डेहराडून शहरात घडला आहे. दरोड्यांनी कर्मचाऱ्यांना घाबरवण्यासाठी बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केले आहे. ही संपुर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे चार दरोडे शो रुममध्ये घुसले. डेहराडून येथील राजापूर रोडवरील रिलायन्स शोरुम मध्ये ही घटना घडली.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी राजपूर रोडवरील शोरुम उघडले होते. त्यानंतर १० ते ११ कर्मचारी दागिने दुकानात लावत होते. डिस्प्ले बोर्डवर २० कोटींहून अधिक किमतीचे हिरे आणि सोन्याचे दागिने होते. साडे दहाच्या दरम्यान चार अज्ञात चोरटे शोरुममध्ये घुसले. सर्व कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून सर्वांचे मोबाईल जप्त केसे. काही कर्मचाऱ्यांना दरोडेखोरांनी त्याला मारहाण केली. महिला कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांना दागिने बॅगेत भरायला सांगितले. १० वाजून ५६ मिनिटांनी चोरटे सर्व दागिन घेऊन फरार झाले.
या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना आरोपींचा शोध लवकरात लवकर घेण्याचे आदेश देण्यात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या रिलायन्स ज्वेलरी शोरुम लुटले गेले ते सचिवालयाच्या आणि पोलिस मुख्यालयाच्या खूपच जवळ असून देखील हा प्रकार घडल्याचे आश्चर्यकारक वाटत आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाला. या घटनेनंतर शहारात मोठी खळबळ उडाली आहे. नागरिंकानी प्रशासनासमोर सुरक्षतेचा प्रश्न उभारला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.