हिमाचल प्रदेशात सात दिवसांत 3 पॅराग्लायडर्सचा मृत्यू
हिमालयाच्या धौलाधरमध्ये अलिकडील दुर्घटनांमुळे पॅराग्लायडर्सच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. हिमाचल प्रदेशात कांगडा जिल्ह्यातील बीर-बिलिंग येथे पॅराग्लायडींगसह अन्य साहसी खेळ खेळले जातात. यंदा काही हौशी पॅराग्लायडर्सच्या मृत्यूमुळे पॅराग्लायडींगच्या मोसमाला गालबोट लागले आहे. 20 ऑक्टोबरपासून पुढील 7 दिवसांत 3 पॅराग्लायडर्सचा मृत्यू झाला असून यामध्ये एका रशियन आणि एका पोलिश नागरिकाचा समावेश आहे. तिसरा पॅराग्लायडर हा मूळचा लखनऊचा रहिवासी होता आणि तो ट्रेनी पायलट होता.
बीर-बिलिंग हे पॅराग्लायडिंगचे प्रसिद्ध ठिकाण आहे. जे जगभरातील पॅराग्लायडर्सला आकर्षित करते.सध्या चालू असलेल्या क्रॉस कंट्री प्री-वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 70 देशांतील 93 पॅराग्लायडर्स सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत एकूण पॅराग्लायडर्सची संख्या ही 300 च्या घरात आहे. मात्र या स्पर्धेदरम्यान झालेल्या मृत्यूंमुळे पॅराग्लायडर्सच्या सुरक्षेच्या उपाययोजनांसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.